कुक्कुटपालन अनुदान योजना
LetsUpp | Govt.Schemes
शासनाच्यावतीने राज्यातील (Maharashtra Government)ग्रामीण भागात (Rural Aria), रोजगार निर्मिती (Employment generation)व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ही वयक्तिक लाभाची योजना २०१३ पासून राबविली जात आहे.
योजनेसाठी प्रमुख अटी :
▪ सर्वसाधारण अर्जदाराकडे ३ गुंठे, अनूसूचित जाती / जमातीच्या अर्जदाराकडे १.५ (दीड) गुंठे मालकीची अथवा भाडेपट्टीची जागा.
▪ अर्थसहाय्यातून उभारलेले कुक्कूटगृह हे कुक्कूट पालनासाठीच वापरणे बंधनकारक.
▪ पक्षीगृहाचे बांधकाम आराखडयाप्रमाणे असावे.
▪ अर्जदाराचे कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीला नसावे.
लाभाचे स्वरूप :
– प्रकल्पाची एकुण किमंत रु. २ लाख, २५०००/-
– सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान
अनूसूचित जाती / अनूसूचित जमातीसाठी ७५ टक्के अनुदान
आवश्यक कागदपत्रे :
▪ ओळखपत्राची सत्यप्रत
▪ ७/१२ व ८-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८
▪ प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
▪ जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
▪ रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची प्रत.
▪ अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा)
▪ रहिवासी दाखला
संपर्काचे ठिकाण : अर्जदार राहत असलेल्या भागातील पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)