वॉशिंग्टनच्या मुलीने पहिल्यांदा साजरा केला ‘फादर्स डे’; सविस्तर जाणून घ्या ‘फादर्स डे’चा इतिहास
Fathers Day: प्रत्येक आई-वडिलांचं आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम असतं यात तीळमात्रही शंका नाही. आपल्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी आणि त्याला एक आदर्श जीवन देण्यासाठी कठोरपणा दाखवण्यात आईवडील हे कधीही मागे राहत नाही. आई जशी ‘दुधावरची साय, लंगड्याचा पाय, वासराची गाय’ असते तसंच मुलांसाठी वडिलांच्या त्यागाची आणि समर्पणाची तुलना कुठेही होऊ शकत नाही. (Washington’s daughter celebrates Father’s Day for the first ti about the history of Father’s Day)
मोठी बातमी : मनिषा कायंदे यांची उबाठाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी, खासदार विनायक राऊतांची माहिती
आई म्हटलं की प्रेम, माया या भावना आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र वडील म्हटलं की राग, कठोरता, भीती याच भावना आपल्या डोळ्यासमोर येणार. आईसमोर आपण आपल्या भावना खुलेपणाने व्यक्त करतो मात्र या उलट वडिलांसमोर आपण आपल्या भावना म्हणाव्या तितक्या सहजतेने व्यक्त करू शकत नाहीत. मुली असतील तर एक वेळेस त्या वडिलांवरचं प्रेम लगेच व्यक्त करतात. मात्र जर का मुलं असतील तर त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल असणारा आदर आणि प्रेम सहजतेने व्यक्त करता येत नाही. वडिलांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना मुलं मागे पडतात. आणि त्याचमुळे वडिलांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो.
पण तुम्हाला हे माहिती आहे का, की जगात पहिल्यांदा फादर्स डे कधी आणि कुणी साजरा केला ते? याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा. (Washington’s daughter celebrates Father’s Day for the first ti about the history of Father’s Day)
<strong>फादर्स डे कधी साजरा केला जातो?
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दरवर्षी जगभरात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 18 जून रोजी फादर्स डे साजरा करण्यात आला.
पहिल्यांदा फादर्स डे कधी साजरा करण्यात आला?
1910 मध्ये पहिल्यांदा जगात फादर्स डे साजरा करण्यात आला. वॉशिंग्टनच्या स्पोकन शहरात फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. वॉशिंग्टनच्या एका रहिवासी मुलीला तिच्या वडिलांनी तिला आई पेक्षा जास्त प्रेम दिले होते. म्हणून तिच्या वडिलांच्या स्मरणार्थ तिने जून महिन्यातील तिसरा रविवार समर्पित केला आणि तेव्हापासूनच फादर्स डे साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.
Indonesia Open 2023: सात्विक-चिरागने पटकावले इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद
पहिल्यांदा फादर्स डे साजरा करणारी मुलगी कोण?
पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करणाऱ्या मुलीचे नाव आहे सोनोरा लुईस. सोनोराच्या आईचा मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी एकट्यानेच तिचा सांभाळ केला. वडिलांनीच सोनोराला आईची माया आणि बापाची सुरक्षा दिली. वॉशिंग्टनच्या या रहिवासी मुलीला वडिलांनी आईची उणीव कधीही होऊ दिली नाही.
फादर्स डे जूनमध्येच का?
फादर्स डे साजरा करण्याची पद्धत सुरू करणाऱ्या सोनोराची ही मागणी पूर्ण करणारी याचिका यशस्वी करण्यासाठी अमेरिकेपर्यंत कॅम्प लावावे लागले. अखेर ही मागणी पूर्ण झाली आणि 19 जून रोजी पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला. फादर्स डे जून मध्ये साजरा होण्याचे मुख्य कारण म्हणजे सोनोराच्या वडिलांचा वाढदिवस जूनमध्येच होता.
फादर्स डे वर अधिकृत घोषणा
पाच वर्षानंतर म्हणजेच 1916 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी फादर्स डे चा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर 1924 मध्ये राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी फादर्स डे हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घोषित केला. त्यानंतर 1966 मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि 1972 मध्ये अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला.