WhatsApp बंद होणार! 8 सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनवर काम करणार नाही
WhatsApp Shutdown : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्स कंपनी मेटाने यूजर्सला इशारा देत मोठी घोषणा केली आहे. मेटाने दिलेल्या माहितीनुसार
WhatsApp Shutdown : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्स कंपनी मेटाने यूजर्सला इशारा देत मोठी घोषणा केली आहे. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअप 8 सप्टेंबर 2026 पासून काही स्मार्टफोनमध्ये काम करणार नाही. मेटानुसार, Android व्हर्जन 6.0 पेक्षा कमी असलेल्या फोन्सवर यापुढे हे ॲप्लिकेशन काम करणार नाही. यूजर्संना नवीन नवीन फीचर्स देण्यासाठी आता ॲपची कार्यक्षमता वाढवण्यात येत आहे. त्यामुळे 8 सप्टेंबर 2026 पासून Android 5.0 किंवा 5.1 वर चालणाऱ्या फोनवरील व्हॉट्सअप सेवा पूर्णपणे बंद होतील.
WhatsApp ने हा निर्णय का घेतला?
व्हॉट्सअपच्या म्हणण्यानुसार, जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम्सना लेटेस्ट आणि सेफ्टी फीचर्स (Security Updates) मिळवणे शक्य होत नाही. जुन्या मोबाईल व्हर्जन हॅकिंग आणि डेटा चोरीच्या (Data Breaches) धोक्यासाठी अधिक असुरक्षित असतात म्हणूनच, मोबाईल युजर्सची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.
या निर्णयाचा कोणावर परिणाम होणार?
या बदलाचा परिणाम अशा यूजर्संवर होणार आहेजे अजूनही 8 ते 10 वर्षे जुने स्मार्टफोन वापरत आहेत. विशेषतः भारतसारख्या देशांमध्ये, जिथे अनेक लोक सॉफ्टवेअर अपडेट्स न करताच वापरणे सुरू ठेवतात.
कोणत्या मोबाईल फोनवर WhatsApp चालणार नाही?
काही जुने मॉडेल्स जसे की Samsung Galaxy S4, Nexus 4 आणि LG G2 अजूनही जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जनवर चालत आहेत. या फोन्समध्ये लवकरच व्हॉट्सअप बंद केले जाईल. यूजर्संना ॲपमध्येच (in-app) सूचना (Notifications) मिळत आहेत, ज्याद्वारे त्यांना या आगामी बदलाबाबत सावध केले जात आहे.
तामिळनाडूत काँग्रेस देणार TVK ला पाठिंबा ; सरकार स्थाापन करण्याच्या तयारीला सुरुवात
यूजर्संनी आता काय करावे?
जर तुमचा फोन सॉफ्टवेअर अपडेट्सना सपोर्ट करत असेल, तर तो Android व्हर्जन 6.0 किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनवर अपडेट करा. जर तो अपडेट होत नसेल, तर तुम्हाला कदाचित नवीन फोन खरेदी करावे लागेल. याव्यतिरिक्त, सपोर्ट बंद होण्यापूर्वी तुमच्या ‘चॅट हिस्ट्री’चा (Chat History) बॅकअप घेणे नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा कोणताही महत्त्वाचा डेटा गमावला जाणार नाही.