लालबागच्या राजाच्या दर्शनाची इच्छा अपुरीच, रांगेत उभ्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेला जयदीप अचानक कोसळला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 19T145229.336

25-year-old man dies of heart attack : गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या जळगावमधील 25 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतानाच तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांत तो खाली कोसळला. तेथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जळगावमध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

जयदीप मेघराज नेमाडे असे 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव असून तो जळगाव येथील रहिवासी होता. जयदीप ट्रांस्पोर्ट व्यवसाय करत होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची इच्छा असल्याने तो मुंबईत आला होता. मुंबईतील गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. यंदा देखील दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असताना जयदीप गुरुवारी रात्री दर्शनाच्या रांगेत उभा होता. मात्र, दर्शनाची प्रतीक्षा करत असतानाच अचानक त्याची प्रकृती बिघडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रांगेत उभे असताना जयदीपला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही वेळातच तो खाली कोसळला. तरुण अचानक कोसळल्याचे पाहून आजूबाजूला उपस्थित असलेल्या भाविकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेतली. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वेळ न दवडता उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टचे 1,500 कधी मिळणार? तारीख आली समोर

अवघ्या 25 वर्षांच्या तरुणाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्यामुळे उपस्थितांनाही मोठा धक्का बसला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे जयदीपचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. काही वेळापूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेला जयदीप अचानक कोसळला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने त्याच्या कुटुंबियांसह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच राज्याबाहेरूनही भाविक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होतात. दर्शनासाठी अनेकदा मोठ्या रांगा लागतात. जयदीपही लालबागच्या राजाच्या दर्शनाची ओढ घेऊन जळगावहून मुंबईत आला होता. मात्र, दर्शन घेण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या अचानक मृत्यूची माहिती जळगावमध्ये पोहोचताच कुटुंबीय आणि परिचितांना मोठा धक्का बसला.

तरुण वयातच जयदीप ट्रान्सपोर्ट व्यवसायात कार्यरत होता. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसोबतच व्यावसायिक आणि मित्रपरिवारातूनही दुःख व्यक्त केले जात आहे. गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. लालबागच्या राजाला ‘नवसाला पावणारा राजा’ म्हणून भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे गणेशोत्सवात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. जयदीपही श्रद्धेने दर्शनासाठी मुंबईत पोहोचला होता. मात्र, रांगेत उभे असतानाच त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. अवघ्या 25 वर्षांच्या तरुणाचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्याने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

follow us