Manoj Jarange Patil : जात पडताळणी समिती रद्द करा; जरांगे पाटलांची मोठी मागणी

Manoj Jarange Patil : न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदीचा डेटा प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मराठा आंदोलक

Manoj Jarange

Manoj Jarange Patil : न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदीचा डेटा प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले आहे त्यांच्या व्हॅलिडीटी द्या. अधिकारी चुकीची माहिती देत आहे. सरकारने सगळ्या व्हॅलिडीट्या दिल्या पाहिजे. तसेच आजपासून मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना हैद्राबाद गॅझेटनुसार (Hyderabad Gazette) प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु करा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तर पुढे बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे. तीन वर्षापासून आमच्या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत. मात्र, ते वेळकाढूपणा काढत आहे. आम्ही तीन वर्ष वेळ दिला. पण यांच्या नियतीत खोट आहे. त्यामुळे अंमलबजावणीशिवाय माघार नाही, वेळ पडली तर मुंबईला जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

जात पडताळणी समिती रद्द करा

यावेळी त्यांनी जात पडताळणी (Caste Verification) समिती रद्द करा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. इतर राज्यात जात पडताळणी समिती नसेल, तर मग महाराष्ट्रात कशासाठी? इतर राज्यांमध्ये जात पडताळणी समिती नाही, हे मंत्री विखे पाटलांनीच (Vikhe Patil) मला सांगितलं असल्याचा दावा यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील 13 मागण्या

1) निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदी त्या नोंदीची कुणबी प्रमाणपत्र सर्वाच्या सर्व तात्काळ वाटप कराव…

2) हैदराबाद गॅझिटिअरचा फक्त जीआर काढण्यात आलाय. गॅझिटिअरमध्ये असलेल्या संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यातच आले नाहीत कुणबी नोंदीच्या संख्येनुसार मराठवाड्यातील सगळ्या मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावं आणि याची व्हॅलिडीटी कशी देणार हे पण लगेच स्पष्ट कराव…

3) सातारा संस्थान गॅझेटटियर, कोल्हापूर संस्थान गॅझेटटियर, औंध -पुणे -बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटटियर तात्काळ जीआर काढून लगेचच अंमलबजावणी करावी…

4) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावीत, अंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घ्यावे.

5) मराठा आणि कुणबी हे स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजासाठी लगेच स्थापन करावं…

6) ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत त्यांना आजची आज कुणबी प्रमाणपत्र द्यावं ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्यांना लगेचच व्हॅलिडिटी द्यावी…

7) मराठा समाजाला ही ओबीसींच्या सर्व सवलती सोयी सुविधा देण्याचा जो जीआर काढण्यात आला त्या जीआरची अंमलबजावणी करावी…

8) सारथीच्या सर्व योजना सुरू करण्यात याव्यात पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचे पैसे तात्काळ द्यावे होस्टेलच्या सुविधा पण द्या…

9) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना तात्काळ नोकरी द्यावी आर्थिक निधी लगेच द्यावा…

10) शिंदे समितीला पुन्हा कुणबी नोंदणी शोधण्यासाठी आजपासूनच रेकॉर्ड तपासण्याचे सांगावे…

11) EWS/SEBC/ESBC मधून निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना आजचे आज नियुक्त द्याव्या…

12) मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत वाहने दिली त्यातूनच व्याज परतावा सरकारने दिले नाहीत.त्या व्याज परताव्याची सपूर्ण रक्कम आजच्या आज द्यावी…

13) सगे- सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी..

इतिहासातील सर्वात मोठा करार; व्हेनेझुएलामधील 65 अब्ज बॅरल तेलावर अमेरिका मिळवणार नियंत्रण

 

follow us