अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता… पीए अमृत डावखर यांचा खळबळजनक दावा
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली.
काल मंगळवार (दि. 2 डिसेंबर)रोजी राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यात बाचाबाची तर काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. बीड जिल्ह्यात गेवराई येथेही पवार आणि पंडित कुटुंबात चांगलच भांडण झालं. त्यामध्ये जखमी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पीए अमृत डावखर जखमी झाले. त्यांनी आज खळबळजनक दावा केला आहे.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली. लाठ्या-काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आल्याची माहिती अमृत डावखर यांनी दिली आहे. एवढेच नाही तर बाळराजे पवार यांनी आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी अमरसिंह पंडित यांच्या बाबत विचारणा केली, त्यांच्या खुनाचा कट रचूनच ते घरी आले होते, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता असा थेट दावा त्यांनी केला आहे.
त्याचबरोबर बाळराजे यांच्याबरबोर काही अनोळखी लोक होते. माझा देखील जीव गेला असता, मात्र गाडी चालकाने मला सोडवलं. अशा प्रकारचा धक्कादायक दावा, अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांनी केला आहे. यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. डावकर यांच्यावर सध्या बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गेवराई काल नगरपालिकेसाठई मतदान होत अताना भाजपाचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला. एकमेकांच्या बंगल्यावर चाल करून जाण्याचा प्रयत्न झाल्याने गेवराईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यासमोरील गाडीवर पंडित समर्थकांनी दगड घालत ती फोडली. त्यानंतर स्वतः पवार हे पंडित समर्थकांच्या अंगावर धावून गेले.
