DRDO Honey Trap : कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट! एटीएसकडून कुरुलकरांच्या पॉलिग्राफ चाचणीची मागणी

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 09T173120.897

ATS want to polygraph of kurulkar in DRDO Honey Trap : पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याचा फोन ATS ने जप्त केला आहे. कुरुलकरांच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव पुढे आल्यानंतर या अधिकाऱ्याचा फोन जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर हनी ट्रॅपमध्ये नेमके किती अधिकारी अडकले आहेत? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

Honey Trap Case : DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकरची रवानगी थेट येरवड्यात…

त्यानंतर आता प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एटीएसने केली आहे. एटीएसने मंगळवारी पुणे सेशन कोर्टात ही मागणी करणारा अर्ज केला होता. या चाचणीतून कुरूलकर यांनी कोणती माहिती पाकिस्तानला पुरवली, पैशांची देवाणघेवाण तसेच यामध्ये आणखी किती लोक सहभागी आहेत ही माहिती या चाचणीतून समोर येऊ शकते.

DRDO Case : कुरूलकरांनंतर एअरफोर्सचा अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात?; चौकशीत धक्कादायक खुलासे

दरम्यान कुरूलकरांची एटीएस कोठडी संपल्याने काल त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांनी कोणती संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्राला पुरवली याचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी एटीएसकडून करण्यात आली होत. ही मागणी मान्य करत न्यायालयाने कुरुलकरांची कोठडीत 15 मेपर्यंत वाढ केली आहे.दरम्यान, एटीएसने ज्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त केला आहे प्रत्यक्षात या अधिकाऱ्याने गोपनीय कागदपत्रे दिली कुणाला दिली आहे का? याचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून केला जात आहे.

Tags

follow us