Bacchu Kadu : मंत्रीपदासाठी वेटिंग पण बच्चू कडू म्हणतात “आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे”
“लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली, आम्ही काही गद्दारी केली नाही. आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे” असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात बच्चू कडू यांच्या महत्वकांक्षेची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला असून आपली इच्छा मुख्यमंत्री बनण्याची आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर त्यांच्यासोबत अनेक मंत्री सोबत गेले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. पण सहा महिने झाले विस्तार न झाल्यामुळे या लोकांमध्येनाराजी वाढत चालली आहे. बच्चू कडू हे देखील या नाराज लोकांमध्ये असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : आमदार धीरज देशमुखांचा जय बेळगाव, जय कर्नाटकचा नारा
त्यातच अमरावती मध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. हा अमरावतीचा पक्ष आहे. दिल्ली, मुंबईचा पक्ष नाही. लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली? असं विचारतात. पण आम्ही काही गद्दारी केली नाही. आमचा पक्ष आहे. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय तर आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे”
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ?
राज्यात गेल्या सहा महिन्यापासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आहे. नव्या विस्तारात कडू यांना स्थान मिळणार की नाही, याची देखील चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली आहे. पण बच्चू कडू यांनी याआधी सुद्धा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला असून आपली इच्छा मुख्यमंत्री बनण्याची आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.