CBSE 10th Student Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 12T141415.898

CBSE 10th Student Result 2023 :  सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीनंतर दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येऊ शकतो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील एन्टर करावे लागतील. यानंतर निकाल तपासता येईल.

असा पहा निकाल

विद्यार्थी त्यांचा निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in , cbseresults.nic.in वर जाऊनदेखील बघू शकतील. यासाठी विद्यार्थांना वेबसाइटच्या होमपेजवरील CBSE 10वी निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. येथे लॉगिन विंडोमध्ये CBSE 10वीचा रोल नंबर टाकाल्यानंतर स्क्रिनवर स्कोअरकार्ड दिसेल विद्यार्थी हा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊ शकतील.

Tags

follow us