छ .संभाजीनगर दंगल : बटन गॅंग कोणाची? शिरसाट यांचा जलील यांना प्रश्न
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पुर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, अचानक 400-500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात. तसेच हे सर्व 10 मिनिटांत कसे काय होणे शक्य आहे, असा प्रश्न देखील आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी त्यांनी खासदार जलील यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर खासदार सांगतात बटन गॅंग यामागे आहे, तर ती बटन गॅंग कोण आहे हे खासदारांनी पोलिसांना सांगितले पाहिजे असेही आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. या संदर्भात मी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.
‘हा तर काळाराम मंदिराच्या सनातन्यांचा माजोरडेपणा’ ; आव्हाडांनी झापले !
रामनवमीच्याच पार्श्वभूमीवर हा सर्व प्रकार मुद्दामून घडवण्यात आल्याचा आरोप देखील संजय शिरसाठ यांनी केला. तसेच गृहमंत्री आणि सरकार याविषयी गंभीर असून मी कालच गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि ते सर्व या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असे प्रत्युत्तर देखील त्यांनी विरोधकांना दिले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगलीदरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. तसेच सौम्य लाठीमारही केला. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.