चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना केली विनंती; म्हणाले, महाराष्ट्रासाठी तरी..

चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना केली विनंती; म्हणाले, महाराष्ट्रासाठी तरी..

मुंबई : ठाण्यातील शिवसेनेच्या (Shiv Sena) शाखेवर काल शिंदे गटाने दावा केल्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाला. या घटनेवर राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिल्यानंतर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राऊतांना खास आवाहन केले आहे.

वाचा : सत्तेतून पैसा पैशांतून सत्ता, आमचं कामच नाही; बावनकुळेंनी सांगितले कसब्यातील पराभवाचे कारण 

ठाण्यातील शिवसेनेच्या शाखेवर कब्जा केल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते. यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ललकारत ठाण्यातील असले प्रकार बंद करावेत. पोलिसांच्या आडून असे हल्ले करण्यापेक्षा मर्द असाल तर समोर येऊन लढा, असे आव्हान त्यांनी शिंदे यांना दिले. हे फक्त ठाण्यातच सुरू आहे. मात्र, लवकरच संपेल. खेडच्या सभेनंतर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाही, असेही राऊत म्हणाले होते.

Mahesh Tapase NCP : फडणवीस की बावनकुळे कोण खरे बोलतंय ते सांगा?

याबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, की संजय राऊतांना विनंती करतो की, त्यांनी मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करावे. राज्यातील जनता विकास मागत आहे. संजय राऊतांनी मनभेद होतील अशी विधाने करू नयेत. त्यांनी आमच्या हातात हात देऊन महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करावे.

राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रंगपंचमीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. हे अश्रू पुसले जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. यासाठी भाजकडून सरकारला विनंती करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube