Deepak Kesarkar शिवसेना भवन नको, शाखा नको…केवळ बाळासाहेबांचा विचार घेणार!
मुंबई : सध्या एक गैरसमज पसरवला जात आहे. शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत, असे काहीही आम्ही करणार नाही. आम्हाला यापैकी काही नको आहे. याबाबचत केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. आम्हाला काही नको फक्त आम्हालो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार घेऊन जायचे आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सेनेची घटना बदलून हक्क स्वतःकडे घेतले आहेत. शिवसैनिकांचे पैसे स्वतःच्या नावावर वळवले हे चुकीचं आहे. आम्हाला शिवसेना भवन नको, आम्हाला शाखा नको, केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हवे आहेत. पार्टी फंडातला पैसा सर्व शिवसैनिकांना द्यावा अशी आम्ही मागणी करत आहे. आम्ही सहा महिन्यांत काय केलं ते दाखवतो. तुम्ही अडीच वर्षात काय केलं दाखवा, असे आव्हान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांनी दिले.
दिपक केसरकर म्हणाले की, मी काल कोल्हापूरला गेलो होतो. तेव्हा आमचं लोकांनी स्वागत केले. आम्हीच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय असं लोकांना खात्री वाटत आहे. उद्धव ठाकरे यांना विनंती की, सहानुभूती निर्माण करणं आता बंद करा. आदरापोटी आम्ही शांत आहोत. जे शासन म्हणून आमचं आहे ते आम्ही घेणार, आम्हाला दुसरं काही नको.
कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत. त्यांच्यावर काही बोलणार नाही. तर उद्धव ठाकरे यांची जीभ घसरायला लागली आहे. त्यांचा आम्ही मान अजून राखतो आहोत. राऊत आणि उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. तसेच सोनू निगमच पोलिसांनी प्रोटेक्शन करावे. या आधीही कलाकारावर हल्ला झाला आहे, असे देखील दिपक केसरकर यावेळी म्हणाले.