दीपाली सय्यद यांचे दाऊद गॅंगशी संबंध; माजी स्वीय सहाय्यकाचा आरोप

दीपाली सय्यद यांचे दाऊद गॅंगशी संबंध; माजी स्वीय सहाय्यकाचा आरोप

अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद भोसले यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्यासोबत सय्यद यांचे आर्थिक संबंध आहेत.

त्या अनेक वेळा दुबईला जातात. त्यांची चौकशी केली तर, त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे.अहमदनगरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

यावेळी सर्व पुरावे माझ्याकडे असून मला संरक्षण द्या,मी राज्य शासन आणि पोलिसांना पुरावे देऊ शकतो, असा दावाही शिंदे यांनी केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत कोविड योद्धा पुरस्कार प्रदान सोहळा झाला.

हा कार्यक्रम सय्यद यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आला होता. त्यावेळी सर्व कोविड योध्यांना ५० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले होते. मात्र हे धनादेश खोटे असून ५० लोकांना दिलेल्या धनादेशापैकी एकही धनादेश बँकेत वटणार नाही. दीपाली सय्यद आणि राज्यपालांनी कोविड योद्ध्यांची फसवणूक केली आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube