रोहित पवारांना उच्च न्यायालयाचा दिलासा, मतदारसंघातील कामावरची स्थगिती उठवली

  • Written By: Published:
रोहित पवारांना उच्च न्यायालयाचा दिलासा, मतदारसंघातील कामावरची स्थगिती उठवली

आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांना राज्यात आलेल्या नव्या सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. पण या स्थगितीवर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर उच्च न्यायालयाकडून स्थागिती उठवण्यात आली आहे. या निर्णयावर रोहित पवार यांनी “सत्यमेव जयते! विकासाच्या वाटेत पाय घालणारेच तोंडावर आपटले!” असं ट्विट करून सरकारला टोला लगावला आहे.

रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी जीवाचे रान केले, नरेश म्हस्केंचा आरोप

काय म्हणाले रोहित पवार

उच्च न्यायालयाच्या निकालांनंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत की, “सत्यमेव जयते! विकासाच्या वाटेत पाय घालणारेच तोंडावर आपटले! माझ्या मतदारसंघातील रस्ते आणि ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या १५८ कोटी रुपयांच्या विकास कामांवर राजकीय द्वेषातून घरभेद्यांनी आणलेली स्थगिती उठवल्याबद्दल मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने मा. उच्च न्यायालयाचे मनापासून आभार!”

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर अनेक कामांना स्थगिती देण्यात आली तर आधीच्या सरकारच्या काळातील अनेक कामे रद्द करण्यात आली. स्थगिती देण्यात आलेल्या कामांमध्ये नगर जिल्ह्यातील आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील कामांचाही समावेश होता. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आमदार आहेत. मागील काळात काही ठिकाणची स्थगिती उठविण्यात आली आहे.

हायकोर्टाचा शिंदे-फडणवीसांना धक्का, आमदार निधी वाटपाला स्थगिती

नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यांतील कामांवरील स्थगिती उठविण्यात आली. पण कर्जत जामखेड मतदारसंघातील कामांवरील स्थगिती कायम होती. त्यावर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, त्यावर उच्च न्यायालयाकडून दिलासा दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube