Atul Londhe : धमक असेल तर.., अतुल लोंढे देवेंद्र फडणवीसांना थेट बोलले

Atul Londhe : धमक असेल तर.., अतुल लोंढे देवेंद्र फडणवीसांना थेट बोलले

मुंबई : जुनी पेन्शन योजना(Old pension scheme) लागू करण्याची ‘धमक’ असेल तर मग पाच वर्षे मुख्यंमत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी झोपा काढल्या का? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.

अतुल लोंढे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त आपल्यातच आहे अशी फुशारकी मारायलाही त्यांनी कमी केले नाही.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विधान केले असले तरी फडणवीस यांच्या कपटनितीची शिक्षकांनाही कल्पना असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

तसेच लोंढे म्हणाले, केंद्रातील अटबलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनेच २००३ साली जुनी पेन्शन योजना बंद करुन नॅशनल पेन्शन योजना (NPS) लागू केली असताना देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत त्याचे खापर काँग्रेस सरकारवर फोडत आहेत.

भाजप नेते आरएसएसच्या शिकवणुकीनुसार धादांत खोटे बोलण्यात पटाईत असतात, त्याप्रमाणे फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे खापर काँग्रेसवर फोडले. नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे सरकारला शक्य नाही, असे स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी सांगितले होते. मग आताच फडणवीस यांच्यात धमक कुठून आली? सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नागपूरच्या अधिवेशनात किंवा मागील ५ वर्षे मुख्यमंत्री असताना ही धमक कोठे गेली होती? जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा केवळ पाठिंबाच नसून काँग्रेसशासित राज्ये राजस्थान, छत्तीसगड, आणि हिमाचल प्रदेशमध्ये जुनी पेन्शन योजना लागूही केली आहे.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव आणि काँग्रेसशासित राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा विचार बदललेला दिसतोय, पण काहीही झाले तरी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, असेही लोंढे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube