नाशकात बिल्डरचे 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार, आयकर विभागाची कारवाई

नाशकात बिल्डरचे 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार, आयकर विभागाची कारवाई

Income Tax Raid on Nashik Builders : नाशिक शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सात मोठ्या व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली. मंगळवारी ही कारवाई पूर्ण झाली. या कारवाईमध्ये तब्बल बिल्डर्सचे 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार समोर आले आहेत. यामध्ये साडेपाच कोटींची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आली आहे. तर राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

या कारवाईसाठी आयकर विभागाला मोठी मोहिम राबवावी लागली. यासाठी तब्बल पाच दिवस लागले असल्याचं सांगण्यात येत आहे. 20 एप्रिल ते मंगळवारी 25 एप्रिलला दिवस-रात्र सुरू असलेली ही कारवाई संपली आहे. तर नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई आणि नागपूर या आयकर विभागााच्या तब्बल 225 कर्मचाऱ्यांचा या कारवाईत समावेश होता. 90 पेक्षा अधिक वाहनांचा ताफा या पथकाकडे होता. तर 150 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता.

Operation Kaveri : 24 तासांत 561 भारतीय सुदानहून रवाना, तीन हजारपेक्षा जास्त लोक अडकले

या कारवाईमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या 40 ते 45 कार्यालय, बंगले, फार्म हाऊसवर छापो टाकण्यात आले. या बांधकाम व्यावसायिकांचे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये त्यांनी कागदावर अतिशय कमी उलाढाल दाखवून करचुकवेगिरी केल्याच संशय आयकर विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

यामध्ये बिल्डर्सचे 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार समोर आले आहेत. यामध्ये साडेपाच कोटींची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आली आहे. तर इगतपुरीत एका बड्या लॉटरी व्यवसायिकाकडे जवळपास 10 ते 15 अधिकाऱ्यांनी तळ ठोकून चौकशी केली. यामध्ये 70 ते 80 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube