अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल; डीजीपी रामचंद्र रावला केलं निलंबित

या व्हिडीओंमध्ये रामचंद्र राव वेगवेगळ्या महिलांसोबत कथितपणे अश्लील चाळे करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 21T153216.299

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि डीजीपी (DGP) रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आलं आहे. रामचंद्र राव हे कर्नाटकमध्ये डीजीपी (सिव्हिल राइट्स एन्फोर्समेंट) या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.सोशल मीडियावर कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर सोमवारी काही व्हिडीओ क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. या व्हिडीओंमध्ये रामचंद्र राव वेगवेगळ्या महिलांसोबत कथितपणे अश्लील चाळे करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे व्हिडीओ समोर येताच राज्य सरकारनं तात्काळ दखल घेत कठोर पाऊल उचलत राव यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सरकारनं चौकशीचे संकेतही दिले आहेत.

दरम्यान, रामचंद्र राव यांनी आपल्यावरील सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. हे सर्व व्हिडीओ पूर्णपणे बनावट असून, त्यांचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.

भाजपला मोठा धक्का, कल्याण -डोंबिवली महापालिकेत शिवसेना मनसेचा महापौर

गृहमंत्र्यांच्या घराबाहेर माध्यमांशी बोलताना राव म्हणाले, “मी पूर्णपणे हादरून गेलो आहे. हे व्हिडीओ खोटे आणि बनावट आहेत. आजच्या काळात कोणाचाही फेक व्हिडीओ तयार करता येतो. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हा कट रचण्यात आला असण्याची शक्यता आहे.” त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, या व्हिडीओंशी त्यांचा कोणताही संबंध नाही. तसचं, हे व्हिडीओ जुने असण्याच्या चर्चेवरही रामचंद्र राव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

1993 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या राव यांना जेव्हा विचारण्यात आलं की हे व्हिडीओ जुने असू शकतात का, तेव्हा त्यांनी सांगितलं की, जर जुने असल्याचा मुद्दा धरला, तर सुमारे आठ वर्षांपूर्वी, बेलगावी येथे पोस्टिंग असताना हा काळ असू शकतो. मात्र, तरीही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं की या व्हिडीओंशी आपला काहीही संबंध नाही. या संपूर्ण वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आज सकाळी मला या प्रकरणाची माहिती मिळाली. संबंधित व्यक्ती कोणत्याही पदावर का असेना, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. आम्ही चौकशी करू आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,” असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या प्रकरणामुळे रामचंद्र राव यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आलं आहे. एका बाजूला कथित अश्लील व्हिडीओ प्रकरणामुळे त्यांना निलंबनाला सामोरं जावं लागलं असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुलीवर स्मगलिंगप्रकरणी कारवाई होऊन ती आधीच तुरुंगात असल्याची माहिती समोर येत आहे.

follow us