जेम्स लेन, सावरकारांनी लिहिलेल्या लिखाणावर कोण बोलतं का? जितेंद्र आव्हाडांचं विरोधकांना खुलं चॅलेंज

जेम्स लेन, सावरकारांनी लिहिलेल्या लिखाणावर कोण बोलतं का? जितेंद्र आव्हाडांचं विरोधकांना खुलं चॅलेंज

ठाणे : छत्रपती शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त लिखाणाबाबत जेम्स लेन यांनी जे लिहिलंय त्यावर कोणी काहीच बोलत नाहीत, तसेच सावरकरांच्या सहा सोनेरी पानं आणि गोवलकरांच्या विचारधन पुस्तकात संभाजीराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केलंय, त्याबद्दल माझ्याशी बोलण्याची कोणाची हिम्मत आहे का? असं खुलं चॅलेंज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचं अजित पवार विधिमंडळात म्हणाले होते. त्यावर आता थेट पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी विरोधकांना सवाल केला आहे.

ते म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या कादंबरीपासून शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील दादाजी कोंडदेव होते, असं चेष्टेत बोलल जातं असल्याचं जेम्स लेन यांनी लिहिलंय. त्यावर कधी कोणी बोललं नाही. हा वाद निष्कारण काढला जात आहे.

शिवाजी महाराजांच्या परंपरेनुसार संभाजी महाराजांनी आपलं स्वराज्य सांभाळलं आहे. संभाजी महाराज कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले आहेत, असं कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. परदेशातल्या इतिहासकारांनी संभाजी राजांबद्दल खूप चांगलं लिहिलंय.

संभाजी महाराज शाक्य परंपरेचे अभ्यासक होते. प्राचीन इतिहासकाराने त्यांना धर्मवीर असं म्हंटलेलं कुठंही लिहिलेलं आढळून येत नाही. जे शिवरायांनी केलं तेच पुढे संभाजीराजांनी केलं असल्याचं आव्हाडांनी म्हंटलंय. त्याचबरोबर आव्हाडांनी इतिहासाच्या पाने वाचून दाखवत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहा सोनेरी पानं या पुस्तकात काय लिहिलंय हेदेखील वाचून दाखवलंय.

ते म्हणाले, सावरकारांनी जे संभाजी राजांबद्दल लिहिलंय ते वाचण्यायोग्य नसून यावर कोणीही काहीच बोलत नाहीत. विरोधकांमध्ये या पुस्तकात जे लिहिलंय त्याबाबत बोलण्यासाठी माझ्याकडं येण्याची हिम्मत आहे काय? असा सवाही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच संभाजी महाराज संगमनेरला सरदेसाईंच्या वाड्यात होते, ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी हा एक प्रश्न आहे. ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना नेण्यात आलं त्या बहादुरगडावर विष्णूचं मंदिर आहे.

औरंगजेब जर हिंदुविरोधी होता तर त्यांने ते मंदिर तोडलं असतं, असंही त्यांनी म्हंटलंय. कमी माहितीच्या आधारावर समोरच्याला कोंडीत पकडायला गेल्यानंतर तो कोंडीत नाही तर इतिहासाची पाने बाहेर येतात, त्यामुळे माझी विनंती आहे, वाद वाढवू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. तसेच शिवरायांच्या काळात मराठा ही जात म्हणून ओळखली जात नव्हती. म्हणून ही व्यापक संकल्प जनगणमनमध्ये आहे.

संगमनेरच्या सरदेसाईंच्या वाड्यातली माहिती औरंगजेबाला कोणी दिली? याचे सर्व पुरावे आहेत त्यामुळे वाद वाढवू नका, असंही ते म्हणालेत. दरम्यान, अजित पवारांच्या स्वराज्यरक्षक की धर्मरक्षक या विधानानंतर राज्यात नव्या तोंड फुटलेलं असतानाचं थेट पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांना चॅलेंज केलंय. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांची काय भूमिका असणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube