बारसूचं आंदोलन चिघळलं ! आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

बारसूचं आंदोलन चिघळलं ! आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Barsu Refinery : बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. रिफायनरीविरोधात सुरू असलेले आंदोलन चिघळत चालले आहे. आज ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांचे उग्र रुप दिसले.

बारसू येथे आंदोलनात स्थानिक नागरिक सहभागी झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. या पोलीस बंदोबस्तातच ज्या ठिकाणी सर्वेक्षण होते तेथे काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि आंदोलकांतच झटापट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील वातावरण आता कमालीचे तणावपूर्ण बनले आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण… अब्दुल सत्तारांनी घेतला यूटर्न

आंदोलक ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे येथे पळापळ झाली. अनेकांना चालताही येत नव्हते. डोळ्यांची जळजळ होत होती. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना तेथून हटवले.

सगळ्यांच्या संमतीनेच निर्णय घेणार – शिंदे

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. बारसूतील रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाल्याचंही पहायला मिळालं. यावर शिंदे म्हणाले, स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प पुढे नेणार नाही. प्रकल्पाला 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचं समर्थन आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पालकमंत्री विखेंच्या मध्यस्थीनंतर शिर्डी बंदचा निर्णय मागे, विखेंनी काय दिले आश्वासन ?

माथी भडकावण्याचे उद्योग – सामंत 

मंत्री उदय सामंत म्हणाले, काही जणांकडून लोकांना भडकावण्याचे काम केले जात आहे. हे आधी थांबले पाहिजे. शेतकऱ्यांना पुढे करून राजकारण केले जात आहे. हे अतिशय घातक आहे. खासदारांना जर काही शंका असेल तर त्या दूर करता येतील. सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही तयार असल्याचे सामंत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube