Devendra Fadnavis : देशपांडे हल्लाप्रकरणी फडणवीस बोलले; म्हणाले, पोलिसांचा तपास..

Devendra Fadnavis : देशपांडे हल्लाप्रकरणी फडणवीस बोलले; म्हणाले, पोलिसांचा तपास..

Devendra Fadnavis : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी पकडले आहेत. यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य काय आहे ते समजेल. देशपांडे यांच्यावर शनिवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकला गेलेले असताना हल्ला झाला होता. या घटनेत पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.

देशातील तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत तसे पत्र नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. या पत्रावर फडणवीस यांनी या विरोधी पक्षांवर जोरदार पलटवार केला. फडणवीस रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे वाचा : जुनी पेन्शन योजना : Devendra Fadanvis यांचा अप्रत्यक्ष नकार!

फडणवीस म्हणाले, की तपास यंत्रणांचा तपास व्यवस्थित सुरू आहे. त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. भाजपमध्ये आल्यावर चौकशा बंद होतात असा विरोधकांचा आरोप असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की भाजपमध्ये आल्यावर चौकशा बंद झाल्या असे एखादे तरी उदाहरण दाखवा. असे कधीच होत नाही. भाजपमध्ये असा नाहीतर आणखी कुठे असा, ज्याने चूक केली त्याची चौकशी होणारच.

एखाद्यावर जर चुकीची कारवाई झाली असेल तर कोर्ट आहे. न्यायालय त्यांना न्याय देईल. पंतप्रधानांना अशा प्रकारे पत्र लिहून तपास यंत्रणांच्या कचाट्यातून सुटका होणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

Devendra Fadanvis : नाकाखालून ४० आमदार गेले तरी बोध घेत नाही

दरम्यान, भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप देशातील नऊ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यात तणाव वाढत असल्याचा आरोप या नेत्यांनी पत्राद्वारे केला होता. केंद्रीय तपासय यंत्रणांनी भाजप सोडून अन्य राजकीय पक्षांना  सातत्याने टार्गेट केल्याचा आरोप या पत्रात केला आहे. सीबीआय (CBI) आणि ईडी सारख्या यंत्रणांचा गैरवापर होत असून यामुळे यंत्रणांंच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube