Maharashtra Monsoon : पुणे, अहिल्यानगर, मुंबईसह 25 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अपडेट
Maharashtra Monsoon : केरळनंतर महाराष्ट्रात देखील मान्सूनने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी
Maharashtra Monsoon : केरळनंतर महाराष्ट्रात देखील मान्सूनने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात देखील झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानाने 8 जून रोजी दमदार हजेरी लावली आहे.
जोरदार पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून देखील दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे कोकणानंतर आता मान्सून (Maharashtra Monsoon ) मुंबईच्या दिशेने सरकरला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज 9 जून रोजी मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने आज हवामान विभागाकडून पुणे (Pune) , मुंबई (Mumbai) ,नाशिक (Nashik) , अहिल्यानगरसह (Ahilyanagar) 25 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, आणि कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून सक्रिय असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
5 दिवसांत 1.99 कोटींचा गुटखा जप्त अन् 192 जणांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई-
तर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.