कसब्यातील निवडणूक विधानसभेत; नाना पटोले-फडणवीस भिडले

कसब्यातील निवडणूक विधानसभेत; नाना पटोले-फडणवीस भिडले

Kasba Bypoll Result : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवला. धंगेकरांचा विजयाचा जल्लोष शहरात साजरा होत असताना इकडे विधानसभेत मात्र कसब्याच्या या निवडणुकीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) भिडल्याचे पहायला मिळाले. कसब्यातील काँग्रेसच्या (Congress) विजयाचे निमित्ताने नाना पटोले यांनी फडणवीस यांना चिमटा काढला तर फडणवीस यांनीही त्यास तितक्याच तडफेने उत्तर दिले.

विधानसभेत कसबा निवडणुकीचा (kasba Bypoll) मुद्दा पटोले यांनी उपस्थित केला. पटोले म्हणाले, की ‘कसबा पोटनिवडणुकीचे निकाल आताच हाती आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तेव्हा आता येथे विधिमंडळातही त्यांच्यासाठी जागा करून द्यावी लागेल.’

वाचा: Kasba Bypoll काँग्रेसच्या धंगेकरांनी ‘ती’ संधी साधलीच!

त्यावर फडणवीस म्हणाले, की ‘मी नानाभाऊंचे अभिनंदन करतो. जसा निर्णय आला तो स्वीकारावाच लागतो. तसा चिंचवडचा निकाल येईल तो ही स्वीकारावाच लागेल. प्रश्न फक्त इतकाच आहे नाना भाऊ, जसं कसब्याचं आत्मचिंतन आम्ही करू तसा तुम्हालाही आत्मचिंतन करावेच लागेल. आताच तीन राज्यांच्या निवडणुका (त्रिपुरा, मेघालय, नागालँड) झाल्या काँग्रेस कुठे दिसतच नाही. आता तर तुमच्यावर ही वेळ आली नानाभाऊ, की एखादा उमेदवार निवडून आला तर तुम्हाला सभागृहात उभे राहून सांगावे लागते. तेव्हा थोडे आत्मचिंतन तुम्ही करा थोडं आत्मचिंतन आम्ही करतो.’

Kasba Bypoll रासने पडले, पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी जवळपास 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. तर दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. येथे भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव केला.

https://www.youtube.com/watch?v=O1nCse0LSL0

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube