भाजप नेते बिघडले, शिंदेंच्या खुर्चीवरच गदा ? ; पाहा, काय घडतंय राजकारण..

भाजप नेते बिघडले, शिंदेंच्या खुर्चीवरच गदा ? ; पाहा, काय घडतंय राजकारण..

BJP Leaders Unhappy With Eknath Shinde :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सत्ताधारी गटाकडून या चर्चांचा इन्कार केला जात असला तरी शिंदे यांनी अचानक घेतलेल्या तीन दिवसांच्या सुट्टीने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. अशातच आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याची. या नेत्यांची नाराजी शिंदे यांना खरच भोवणार का ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली आहे. निकाल केव्हाही येण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर जर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आलाच तर राजीनामा तयार ठेवा, असेही दिल्लीतून शिंदेंना सांगण्यात आल्याची माहिती आहे.

कर्नाटक BJP कडून तब्बल दीड लाख कोटी रुपयांची लूट, प्रियंका गांधींनी केले आरोप

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री एकाच महिन्यात दुसऱ्यांदा राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत भाजपलाच आता शिंदे नको आहेत असे सांगितले जात आहे. यामागे कारणेही तशीच घडली आहेत. तर दुसरीकडे खुद्द शिंदे हे सु्द्धा नाराज असल्याने त्यांच्या गावी साताऱ्याला निघून गेल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना बळ मिळाले आहे.

भाजप नेतृत्वाने जो विचार करून शिंदेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिली होती. ते साध्य झाले नाही. एकतर शिंदे मराठा नेता म्हणून जनतेवर छाप पाडण्यात अपयशी ठरले आहेत. ठाणे आणि पलीकडे ते जाऊ शकले नाहीत. खारघर दुर्घटना, वेदांता फॉक्सकॉन प्रकरणातही ते एकाकी जाणवले.

Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं

सत्तेत आल्यानंतर शिंदेंना लोकाभिमुख निर्णय घेता आले नसल्याचीही चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे, शिंदे यांनी बंड केल्यानंतरही जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळत असल्याचे दिसून आले आहे.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला जागा जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे काही सर्वेक्षणातून समोर आले आहे. या कारणांचा विचार करता लोकसभा निवडणुकीत अडचणी येऊ नयेत, यासाठी एकनाथ शिंदेंबाबत पुन्हा विचार करण्याची वेळ भाजप नेतृत्वावर आल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube