‘हिवताप’ रोखला ! नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत ‘इतके’ रुग्ण; जाणून घ्या, लक्षणे काय ?

‘हिवताप’ रोखला ! नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांत ‘इतके’ रुग्ण; जाणून घ्या, लक्षणे काय ?

World Malaria Day : सध्याच्या बदलत्या हवामानामुळे घरोघर व्हायरल आजारांचे रुग्ण वाढले आहेत. ताप, खोकल्याचे रुग्ण आहेतच शिवाय डासांपासून होणाऱ्या डेंग्यू, चिकुनगुण्या या आजारांचेही रुग्ण आढळतात. सध्या हे आजार नियंत्रणात आहेत. पावसाळा दोन महिन्यांवर आला आहे. या दिवसांत किटकजन्य व साथरोगांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे आरोग्य विभागाने नियोजन सुरू केले आहे. आज (25 एप्रिल) जागतिक हिवताप दिन (World Malaria Day) आहे. हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे सध्या हा आजार नियंत्रणात आहे.

या वर्षात मार्च महिन्यापर्यंत हिवताप विभागाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील जवळपास 5 लाख 32 हजार 07 रक्त नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये फक्त नाशिक शहरात दोन रुग्ण आढळून आले, अशी माहिती नाशिक विभागाचे सहायक संचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली. याआधी जानेवारी ते डिसेंबर 2022 अखेर नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण 22 रुग्ण आढळले होते. यामध्ये नाशिक 7, धुळे 5, नगर 5, नंदूरबार 3 आणि जळगाव जिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश होता.

bird flu : चीनमध्ये नव्या व्हायरसचा कहर, 56 वर्षीय संक्रमित महिलेचा मृत्यू

उन्हाळ्यात जास्त तापमानात डास कमी असले तरी पावसाळ्यात मात्र डासांची संख्या वाढते. डासांमुळे अनेक आजारांचा फैलाव होतो. डेंग्यू, मलेरिया (हिवताप), चिुकनगुण्या या आजारांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. राज्यात सध्या हिवताप निर्मुलनावर भर देण्यात आल्याचे डॉ. गांडाळ यांनी सांगितले.

हिवताप कसा होतो ?

हिवताप हा परजीवी रोग जीवघेणा ठरू शकतो. हा रोग प्लाज्मोडीयम व्हायव्हॅक्स (पी.व्हायव्हॅक्स),प्लाज्मोडीयम मलेरी,(पी. मलेरी) आणि प्लाज्मोडीयम ओव्हेल (पी. ओव्हेल) या परजीवी रोगजंतुंमुळे होतो. अॅनाफीलीस क्युलीसीफॅसीस नावाच्या मादी डासाच्या चाव्यातनू तो पसरतो.चावा घेतल्यानतंर १० ते१४ दिवसांनतंर या आजाराची लक्षणे दिसून येतात.

हिवतापाची लक्षणे

सामान्यतः, हिवतापामुळे ताप, डोकेदुखी, उलट्या आणि इतर फ्लुसारखी लक्षणे दिसतात.

हा परजीवी लाल रक्तपेशींना सक्रंमित करुन नष्ट करतो. त्यामळे अशक्तपणा, चक्कर येणे/ मळमळणे असे त्रास होतात. थकवा जाणवतो.

तापासोबतच थकवा, भान नसणे किंवा बेशुद्धी, श्वसनाला त्रास होणे,तीव्र अशक्तपणा मळमळणे, फिट येणे, उलट्या होणे.

गर्भधारणेच्या दरम्यान हिवताप झाल्यास आईला, गर्भाला आणि नवजात बाळाला मोठा धोका होऊ शकतो.

उष्माघात ठरू शकतो जीवघेणा, बचावासाठी हे उपाय जाणून घ्या

या वेळेत सावध राहा

प्रत्येक कीटकाच्या चावण्याची वेळ ही त्यांच्या अनुवांशिक गुधर्मानुसार ठरते. परंतु, वातावरणाच्या स्थितीचा त्याच्यावर तत्काळ प्रभाव पडतो. अॅनाफीलीस क्युलीसीफॅसीससह बहुतांश कीटक संध्याकाळ झाली की लगेच चावायला सरुवात करतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube