एमबीए प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; CET Cell ने जाहीर केले वेळापत्रक
CET Cell MBA Admission Schedule : एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
CET Cell MBA Admission Schedule : एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) सुरू केली असून, त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 2 जुलै ते 12 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती, नियमावली आणि वेळापत्रक CET Cell च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1500 रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच 3 जुलै ते 13 जुलैदरम्यान कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) आणि अर्जाची ऑनलाइन पुष्टी (Confirmation) करण्याची सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शनिवारी आणि रविवारीही पडताळणी केंद्रे सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी 15 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीबाबत काही हरकती किंवा दुरुस्त्या असल्यास त्या 16 ते 18 जुलै या कालावधीत ऑनलाइन नोंदवता येतील. त्यानंतर सर्व हरकतींची छाननी करून अंतिम गुणवत्ता यादी 20 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोन वेळा CET परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
ठाकरेंच्या 6 खासदारांसाठी भाजपची दारं बंद का? ‘ऑपरेशन टायगर’ वर CM फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा
अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला. एमबीए CET चा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा सुरू होती. आता अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्याने प्रवेश प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.