मुंब्र्यात पती आणि भावाची मदत घेत महिलेने काढला प्रियकराचा काटा; मृतदेह ड्रममध्ये भरला अन्…
Mumbra Police : मुंब्र्यात विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी
Mumbra Police : मुंब्र्यात विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह एका ड्रमध्ये भरुन नाल्यात फेकून दिला होता मात्र फोन लोकेशन आणि इतर तांत्रिक तपासाने पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे तर दोन जण फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्र्यात राहणारा अरबाज मकसूद अली खान दादरला कामावर जातो असं सागून घरातून निघाला होता मात्र तो परतला नसल्याने त्याचा कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला पण त्याचा काही पत्ता न लागल्याने अरबाजच्या वडीलांनी मुंब्रा पोलीस (Mumbra Police) ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी तपासच्रक फिरवत अरबाजचे फोन लोकेशन आणि कॉल्स डिटेल्स तपासले. या माहितीवरुन अरबाजचा शेवटचे लोकेशन वर्साेवा (Versova) परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच त्याची प्रेमिका मेहजबीन शेख हिचे देखील लोकेशन त्याच परिसरात आढळल्याने पोलिसांनी महेजबीनला ताब्यात घेत तपास सुरु केला. या तपासात तिने गुन्ह्याची कबुली दिली.
खंडणीचा प्रयत्न अन् हत्या
पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी मेहजबीनने पती हसन आणि भाऊ तारिकसोबत मिळून अरबाजकडून खंडणी उकळण्याचा आणि हत्या करण्याचा कट रचला होता. या कटानुसार आरोपींनी अरबाजला वर्सोवा येथे बोलावून त्याचे हात बांधले आणि पाईपने त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने आरोपींनी अरबाजचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून ड्रम एका निर्जन नाले परिसरात फेकून दिला.
मोठी बातमी! NEET परीक्षेची नवीन तारीख जाहीर; 21 जून रोजी होणार परीक्षा
तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारिकला अटक केली आहे. तर पती हसन आणि त्याचा आणखी एक साथीदार फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.