Download App

आमचा मात्र अभिमन्यू झाला; काका-पुतण्याच्या वादात गारटकर यांनी वेधलं लक्ष

NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत. आमचा मात्र अभिमन्यू झाला आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ( NCP District President Pradip Gartkar says we were Abhimanu in Sharad Pawar Ajit Pawar NCP Political Crisis )

थोरातांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवा, अहमदनगर काँग्रेसची मागणी

काय म्हणाले प्रदीप गारटकर?

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत आमचा मात्र अभिमन्यू झाला आहे. आम्ही शरद पवार यांचे का अजित पवार यांचे या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. काही आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याची भूमिका ठरवू. उद्या पुणे जिल्ह्यातील लोकं अजित दादा यांच्या बैठकीला जातील तर काही लोकं शरद पवार यांच्या बैठकीला जातील. अशी भूमिका यावळी गारटकर यांनी घेतली आहे.

विखे यांचे नाव CM पदासाठी चर्चेत….. पण वेळ अशी आली की ‘महसूल’ जाण्याची चिन्हे!

पुढे ते म्हणाले की, काल रात्री या बैठकीचे उशिरा निरोप गेले. त्यामुळे काही जण हजर नाहीत. जिल्हा राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्र आहोत. तसेच 4 ते 5 तालुका अध्यक्ष जे आज उपस्थितीत नाहीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. तसेच राज्यात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. त्यावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून रात्री निर्णय घेऊ.

दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर काल (दि. 3) शरद पवारांनी कराड येथे जाऊन प्रितीसंगमावर जात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील चित्र पालटलेले असेल असे सांगितले. त्यानंतर दुपारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आमच्याकडे आमदारांचा पाठिंबा असल्याचा पुनरूच्चार करत त्यांना कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा खुलासा केला असून, त्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठकीचे सत्र सुरू झाले आहे.

Tags

follow us