तयारीला लागा! अजित पवारांनी संभाव्य उमेदवारांना दिली हिंट

तयारीला लागा! अजित पवारांनी संभाव्य उमेदवारांना दिली हिंट

Ajit Pawar On 2024 Loksabha :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल मुंबई येथे एक बैठक पार पडली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. मतदारसंघाचा आढावा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, उमेदवारांची चाचपणी, जागावाटप अशा टप्प्यांवर या निवडणुकीत चर्चा झाली.  याबैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे , खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या संदर्भात काय आढावा घ्यावा तो आमचा अधिकार आहे. आम्ही आमच्या पक्षातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या लोकांना बोलावलं आहे. त्यांच्याशी चर्चा करताना आजूबाजूच्यादेखील मतदारसंघाची चर्चा होती. ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होईल, त्यावेळी आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असे अजितदादा म्हणाले.

चौंडीतील वादावरून अजित पवारांचे कानावर हात; म्हणाले रोहितनं…

परंतू जागांचे वाटप झाल्यानंतर त्यानंतर निवडणुकीला लागण्यापेक्षा आत्तापासूनच जर हिंट दिली तर तर तो चांगली तयारी करु शकतो. लोकसभेचा मतदारसंघ हा 6 विधानसभांचा मिळून असतो. जवळपास 18 ते 25 लाख मतदारांपर्यंत त्याला पोहोचायचे असते, असे अजितदादा म्हणाले. लोकसभेला 1 वर्षांचा अवधी आहे. जर कुणाला उभे करायचे असल्यास त्याला आत्ताच हिंट दिली तर तो संपर्क करु शकतो. पण ऐनवेळी एवढे फिरणे शक्य होते नाही, असे अजितदादांनी सांगितले.

Rohit Pawar यांच्याकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवींची जयंती साजरी; राम शिंदे म्हणाले, प्रथा, परंपरा…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये लोकसभेच्या अनेक जागांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. अहमदनगर दक्षिण जागेसाठी पारनेरचे तरुण आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, घनःश्याम शेलार यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती आहे. तर शिरुरच्या जागेसाठी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व दिलीप मोहिते पाटील यांची नाव चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube