अजितदादा हेच राष्ट्रवादीचे प्रमुख राहणार; भुजबळांनी पवारांना ठणकावले

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 06T112155.877

Chhagan Bhujbal On Sharad Pawar :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादाच राहणार असे ठणकावून सांगितले आहे. अजित पवार यांच्या गटाकडून 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले असून त्यात अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही सरकारमध्ये सामील होण्याच्या अगोदर त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि सह्या घेतलेल्या आहे. अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहे आणि राहतील. निर्णय घेण्याआधी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे. यासाठी पक्षाची घटना पूर्णपणे आम्ही पाळली आहे. निवडणून आयुक्तांकडे असलेले नियम पाहून त्यांची मांडणी करण्यात आलेली असल्याचे भुजबळ म्हणाले.

दिलीप वळसेंबद्दल सांगताना साहेबांचे डोळे पाणावले होते, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

तसेच शरद पवारांना सोबत घेण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये अनेक बैठका झाल्या. पण मार्ग निघाला नाही, त्यामुळे आम्ही पुढे गेलो, असे ते म्हणाले. यावेळी भुजबळांना अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधल्याचे विचारण्यात आले. त्यावरही भुजबळांनी भाष्य केले आहे.

ते म्हणाले की,  एक तर तुम्ही त्या वाटेला जायचंच नाही. तुम्ही एकदा -दोनदा गेलात तर ठीक आहे. पण चार-पाच वेळा जाऊन तुम्ही शब्द फिरवलात. यामुळे समोरच्या पक्षातील नेत्यांमध्ये आपल्या पक्षाविषयी आपल्या पक्षातील नेत्यांविषयी राग येणं स्वाभाविक आहे. त्याचे पडसाद वेळोवेळी आम्ही पाहिले, असे म्हणत भुजबळांनी पवारांना आजही सुनावले.

अजितदादांच्या बंडाने नगर शहरातील भाजपची राजकीय गणितं बिघडली… पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

दरम्यान, काल अजित पवार यांच्या गटाकडून 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले असून त्यात अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार हे आपल्या काकांनाच पक्षातून डच्चू देण्याच्या तयारीत असल्याचे दिसते आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube