होळी, मोहर्रम आणि गांधी जयंतीला ‘ड्राय डे’ राहणार; व्हायरल बातम्यांवर अखेर सरकारचे स्पष्टीकरण

Maharashtra Dry Day's News होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या दिवशी दारू विक्रीय परवानगी देण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.

  • Written By: Published:
होळी, मोहर्रम आणि गांधी जयंतीला 'ड्राय डे' राहणार; व्हायरल बातम्यांवर अखेर सरकारचे स्पष्टीकरण

Maharashtra Dry Day’s News :  होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या दिवशी दारू विक्रीय परवानगी देण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, आता यावर उत्पादन शुल्क विभागाने स्पष्टीकरण दिले असून, सोशल मीडियावर व्हायरल होणारे वृत्ता खोटे असल्याचे महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Video : डिजिटल अरेस्ट झालाच तर… कळीचा मुद्दा अन् फडणवीसांनी दूर केली सर्वांच्या मनातली भीती

व्हायरल पोस्टवर विश्वान न ठेवण्याचे आवाहन

महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क धोरणात कोणताही बदल केलेला नसून, होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या दिवशी दारू बंदी कायम राहणार असल्याचेही देशमुख म्हणाले. उत्पादन शुल्क नियमांमधील बदलांबाबत सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देशमुख यांनी जनतेला केले आहे.

दामगुडे अन् हनुमंत पवार यांच्यातील वाद नेमका काय? हाणामारीमागे पडद्यावरची ‘चर्चा’ ठरली खरं कारण

सोशल मीडियावर काय व्हायरल होत होते?

महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क धोरणात महत्त्वपूर्ण बदल करत होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या पारंपरिक ‘ड्राय डे’ दिवशी दारूविक्रीस परवानगी दिल्याचे वृत्त मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. ज्यात नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिकृत मद्यविक्री दुकाने होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या दिवशी नियमितपणे सुरू राहतील असा दावा करण्यात आला होता. मात्र, आता व्हायरल होणारे वृत्त पूर्णपणे खोटे असून, होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या दिवशी दारू विक्रीस बंदी कायम असणार आहे. सध्याच्या नियमांनुसार, २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), ३० जानेवारी (शहीद दिन), १ मे (महाराष्ट्र दिन), आषाढी एकादशी, १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), अनंत चतुर्दशी, २ ऑक्टोबर (गांधी जयंती) आणि कार्तिकी एकादशी या दिवशी दारू विक्रीवर बंदी कायम असणार आहे.

follow us