महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

Yogesh Soman : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Yogesh Soman

Yogesh Soman : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर अध्यक्ष म्हणून सुनील महाजन तर प्रमुख कार्यवाहक प्रा. राजन लाखे, कोषाध्यक्ष उन्मेष गायधने यांची निवड करण्यात आली आहे. तर पुरुषोत्तम काळे यांची पीठासीन अधिकारी म्हणून सदस्यांनी निवड केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरुद्ध 21 विरुद्ध 0 असा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळातील 21 सदस्यांनी 27 ऑक्टोबरला अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप घेतले होते. यात – जिल्हा प्रतिनिधी आणि शाखा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे
– शाखांशी पुरेसा संवाद नसणे
– ‘नांदी’ साहित्य संमेलनांच्या नियोजनात स्थानिक शाखांना डावलणे
– प्रशासकीय कामकाजातील अनियमिततेचे आरोप
– आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप
– कार्यकारी मंडळाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप
– विश्वस्त नियुक्ती, भरती आणि संमेलन आयोजनातील अनियमिततेचे आरोप

अशा मुद्द्यांचा समावेश करण्यात आले होते.

बातमी अपडेट होत आहे… 

follow us