ते लिव्ह इनमध्ये होते पण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी अंतिम निष्कर्ष नाही; मुंडेंच्या वकिलांनी स्पष्टच सांगितलं

  • Written By: Published:
ते लिव्ह इनमध्ये होते पण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी अंतिम निष्कर्ष नाही; मुंडेंच्या वकिलांनी स्पष्टच सांगितलं

Dhananjay Munde – Karuna Sharma Case : मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः करूणा शर्मा (Karuna Sharma) आणि मुले यांच्याबरोबर लिव ईनमध्ये (live-in relationship) असल्याबाबतची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने आजचा निकाल दिला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत (Sayali Sawant) यांनी दिली आहे. तसेच मुंबई न्यायालयाने (Mumbai Court) कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर 04 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. त्यामुळे मीडियाने जबाबदारीने आणि अचूक वृत्तांकन करावे. असे आवाहन देखील यावेळी केला.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या वरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे. धनंजय मुंडे यांच्या वकील ऍड. सायली सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत याआधी जाहीर खुलासा करत ते करुणा शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहिल्याबाबत यापूर्वीच कबुली दिलेली असून, आजच्या अंतरिम आदेशाला त्याचाच आधार असल्याचे वकील सायली सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

माध्यमांना विनंती आहे की जबाबदारीने व अचूक वृत्तांकन करावे आणि आदेशाबाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या वृत्ताकनापासून दूर राहावे. कोणत्याही मीडियाच्या व्यक्तीला काहीही शंका असल्यास ते रिपोर्टिंग करण्यापूर्वी वकिलांकडून स्पष्टीकरण मागू शकतात आणि असे स्पष्टीकरण देऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केला. तसेच विनाकारण कोणाचीही बदनामी करणारे वृत्त्त देऊ नये असे आवाहनही यावेळी केले आहे.

कोर्टाचा निकाल नेमका काय?

करूणा शर्मा यांना महिन्याला 1 लाख 25 हजार रूपये पोटगी म्हणून द्यावे. तसेच त्यांची मुलगी शिवानी मुंडेला दरमहा 75 हजार रूपये लग्नापर्यंत देण्याचे निर्देश न्यायालयाने धनंजय मुंडेंना दिले आहेत. हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या हिशोबाने द्यावेत असेही न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय या खटल्याचा 25 हजार रूपयांचा खर्च धनंजय मुंडेंनी करूणा शर्मा यांना द्यावा असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे.

एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते

या निकालावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा म्हणाल्या, “गेल्या तीन वर्षांत मी खूप त्रास सहन केला. पोटगी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते, विशेषतः जेव्हा पती उच्च पदावर असतो आणि संपूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करत असते. मोठे वकील असूनही मी ही लढाई लढली आणि अखेर न्याय मिळाला. माझ्या वकिलांचे मी मनःपूर्वक आभार मानते.” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube