Onion Price: टोमॅटोचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने ‘बफर स्टॉक’साठी 20 टक्के अधिक म्हणजे एकूण 3 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. यासाठी लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा ठेवला जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित सिंग यांनी आज (रविवार) सांगितले.
2022-23 या आर्थिक वर्षात सरकारने 2.51 लाख टन कांदा बफर स्टॉकसाठी ठेवला होता. कमी पुरवठ्याच्या हंगामात किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी (PSF) अंतर्गत बफर स्टॉक केला जातो.
सणासुदीत कांदा महागणार नाही
सिंग म्हणाले, “सणासुदीच्या काळात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने यावर्षी 3 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे, ज्यामुळे बफर स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे कांद्याची कमतरता नाही.”
नुकताच संपलेल्या रब्बी हंगामाचा कांदा खरेदी केला
बफर स्टॉकसाठी खरेदी केलेला कांदा नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगामातील आहे. सध्या खरीप कांद्याची पेरणी सुरू असून त्याची आवक ऑक्टोबरमध्ये सुरू होते. रोहित सिंग म्हणाले, “सामान्यत: किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती 20 दिवसांपर्यंत किंवा बाजारात खरीपाचे पीक येईपर्यंत वाढलेल्या राहतात. मात्र यावेळी अशी कोणतीही अडचण येणार नाही.
2024 च्या लोकसभेची BJP ला धास्ती, म्हणून तोडा-फोडीचं राजकारण, खा. कोल्हेंचे खळबळजनक दावे
सुरक्षित ठेवण्यासाठी BARC सोबत चाचणी
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अणुऊर्जा विभाग आणि BARC सोबत कांद्याच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. रोहित सिंग म्हणाले, “प्रायोगिक तत्त्वावर, आम्ही महाराष्ट्रातील लासलगाव येथे 150 टन कांद्याचे जतन करण्यासाठी कोबाल्ट-60 मधील गॅमा रेडिएशन वापरत आहोत. याच्या मदतीने कांदा जास्त काळ सुरक्षित ठेवता येतो.
सावधान! पावसाळ्यात किडनी होऊ शकते निकामी, जाणून घ्या कशी घ्यायची काळजी
कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 26.79 रुपये प्रति किलो
सरकारी आकडेवारीनुसार, 15 जुलै रोजी अखिल भारतीय पातळीवर कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 26.79 रुपये प्रति किलो होती. त्याची कमाल किंमत 65 रुपये आणि किमान 10 रुपये प्रति किलो होती.