कोण कधी कोणाच्या गाडीत बसेल सांगता येत नाही… विखेंनी शिंदेंना डिवचलं

कोण कधी कोणाच्या गाडीत बसेल सांगता येत नाही… विखेंनी शिंदेंना डिवचलं

Sujay Vikhe on Ram Shinde : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमुळे सध्या नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसली आहे. आज खासदार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मतदार संघात जात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. सध्या कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाच्या गाडीत बसलाय याचा थांगपत्ता देखील कुणाला आजकाल लागत नाही, असे म्हणत खासदार सुजय विखे यांनी नाव न घेता आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

निलेश लंके यांचा मतदार संघ असलेला पारनेर तालुक्यातील कर्जुले हरेश्वर याठीकाणी आज विखे यांनी हजेरी लावली. यावेळी कर्जुले हरेश्वर या ठिकाणी 3.68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात तसेच जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत केले.

लंके- शिंदेंवर जोरदार निशाणा
यावेळी नगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना विखे म्हणाले, सध्या कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाच्या गाडीत बसलाय याचा थांगपत्ता देखील कुणाला आजकाल लागत नाही. तसेच विकासकामांवर बोलताना यावेळी त्यांनी आमदार निलेश लंके यांना देखील शाब्दिक टोले लगावले. यावर बोलताना विखे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आल्याने विकासकामे होत आहे.

मुख्यमंत्रिचा उपमुख्यमंत्री अन् आता त्याचाही हाप वन; सुळेंनी फडणवीसांना डिवचलं

पाणीप्रश्न गंभीर बनला होता मात्र केवळ पारनेर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पाण्याचा प्रश्न मिटविण्याचे श्रेय पंतप्रधानांना जाते. त्यामुळे कामाचे श्रेय घेणाऱ्यांनी घ्यावे, परंतु आमचे नेते नरेंद्र मोदी आहेत असे जनतेला सांगावे. किमान विकासकामांचे श्रेय घेताना ज्यांनी सदर योजना सुरू केल्या आहेत, त्यांचा फोटो तरी लावावा कारण गोरगरीबाला पिण्याचे पाणी देण्याचे काम हे मोदींच्या नेतृत्वात होत आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी असे म्हणतच विखेंनी लंकेवर निशाणा साधला.

‘चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षणच आमचं लक्ष्य’; जरांगेंच्या समर्थनात ‘मराठा’ मैदानात

मागच्या दीड वर्षांमध्ये राज्यात भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube