Local Body Election : नगर महापालिकेत येणार प्रशासकराज! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Local Body Election : नगर महापालिकेत येणार प्रशासकराज! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Local Body Election : इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षण व महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Local Body Election)सर्वोच्च न्यायालयात (Supreme court)सुनावणी सुरू आहे. या निकालावरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगर महापालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. ही सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

आमदार जगतापांच्या शिष्टाईला यश! नगर महापालिका कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च मागे

नगर महापालिकेत नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून प्रशासक (administrator)कारभार पाहतील. राज्यात मागील दीड वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत या निवडणुका तशाच प्रलंबित आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.

Baramati Agro : ‘मी डगमगणार नाही अन् झुकणार नाही’; काररखान्याच्या नोटीसीवरून रोहित पवारांनी सुनावलं

राज्यातील 15 महापालिका, 92 नगरपालिका, बहुतांश जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य टांगणीला आहे. यात नगर जिल्ह्यातील 9 नगरपालिका, जिल्हा परिषद व लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. 

दीड वर्षांपासून नगर जिल्हा परिषदेवर प्रशासक कार्यरत आहेत. तर 9 नगरपालिकांवरही प्रशासक आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषदेतील जागेची निवडणूक देखील प्रलंबित आहे. माजी आमदार अरुण जगताप हे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर गेले होते. त्यांचा कालावधी संपूनही आता दोन वर्षे होत आली आहेत.

जिल्हा परिषद व 9 नगरपालिकांची निवडणूक न झाल्याने विधानपरिषदेच्या मतदारांचे कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूकही प्रलंबित आहे. या निवडणुका पावसाळ्यानंतर लगेच होतील अशी आशा इच्छुक उमेदवारांत आहे. त्यादृष्टीने त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवारांतही चिंतेचे वातावरण आहे.

नगर महापालिकेतील नगरसेवकांची मुदत 31 डिसेंबरला संपणार आहे. तोपर्यंत निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. निकाल लागला तरी मतदार यादी कार्यक्रम व सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमामुळेही नगर महापालिकेत प्रशासक राज लागणार आहे. महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपायला आजपासून अवघे 88 दिवस बाकी राहिले आहेत. मागील सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2018 मध्ये झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube