गतिमान सरकार म्हणायचं अन् लोकांना ताटकळत ठेवायचं… तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल

गतिमान सरकार म्हणायचं अन् लोकांना ताटकळत ठेवायचं… तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल

Prajakta Tanpure : जनतेची काम तातडीने होत असून हे केवळ गतिमान सरकारमुळे शक्य झाले अशी वक्तव्य सध्या सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र सरकारच्या याच घोष वाक्याचा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पाथर्डीत नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये काम करून घेताना निर्माण झालेल्या अडचणी तनपुरे यांनी जाणून घेतल्या. गतिमान सरकार म्हणायचे आणि गरीब लोकांना ताटकळत ठेवायचे हा शासनाचा कसला कारभार सुरू आहे, अशी टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

तनपुरे यांनी पाथर्डी तालुक्यातील तहसील कार्यालयात तहसिलदारांची भेट घेऊन नागरिकांच्या तक्रारी प्रशासन दरबारी मांडल्या. संजय गांधी निराधार योजनेतर्फे विधवा, परितक्त्या भगिनींना लाभ मिळावा यासाठी त्या सर्व बाबींची पूर्तता करून अर्ज दाखल करतात. मात्र लहान त्रुटींमुळे गेल्या वर्षभरापासून काही अर्ज रखडल्याची प्रकरणे आहेत. या महिलांना योग्य मार्गदर्शन केले जात नाही आणि मग त्या आर्थिक आधारापासून वंचित राहतात. यासाठी आमदार तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

तसेच तनपुरे यांनी यावेळी सेतू केंद्रांवर देखील अचानक भेट दिली. यावेळी अनेकांनी सेतू कार्यालयात प्रकरणे दिली जातात. मात्र, लवकर मंजुरी मिळत नाही, काही दलालांनी लाभार्थ्यांकडून पैसे घेतले, सेतूचालक अडवणूक करतात, अशी व्यथा मांडली. यानंतर तनपुरे यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांच्यासह काही सेतू केंद्राला भेट दिली.

Ajit Pawar : जागा तिथंच आहे, मग चौकशी कसली करता? अजित पवारांचा विरोधकांना सवाल

सेतू केंद्रांवर माहितीचे फलक नाहीत, त्यामुळे सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना तनपुरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. येत्या आठवडाभरात सर्व सेतू केंद्रांवर माहिती फलक लागलेच पाहिजेत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ही नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याशिवाय नवीन रेशन कार्ड वाटप, रेशन कार्डवर धान्य न मिळणे अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यावरील कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आदेश आमदार तनपुरे यांनी प्रशासनाला दिले आहे.

Ajit Pawar : ‘त्या’ भूखंडाची विचारपूस केली पण… अजितदादांनी फेटाळले बोरवणकरांचे आरोप

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत रासायनिक द्रव्य
तिसगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्‍तीने रासायनिक द्रव्य टाकल्याचा धक्कादायक प्रकार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीत उघडकीस आला. या घटनेने संतप्त झालेल्या तनपुरे यांनी तिसगावच्या ग्रामसेवकाची कानउघाडणी केली. तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube