Shrikant Dhiware : अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले! जुगार अड्ड्यांवर छापा, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…

Shrikant Dhiware : अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले! जुगार अड्ड्यांवर छापा, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…

Shrikant Dhiware : धुळे (Dhule)जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर लगेच श्रीकांत धिवरे यांनी धडाकेबाज कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतः अन्य पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील बंद असलेल्या राजकमल टॉकीजमधील(Rajkamal Talkies) एका खोलीत गेल्या अनेक वर्षापासून चालणारा जुगारअड्डा (Gambling)आणि नंतर मुंबई-आग्रा महामार्ग पोलीस चौकी (Mumbai-Agra Highway Police Post)परिसरात अवैध स्क्रॅप विक्रेत्यांसह गोदामावर छापा टाकून आपल्या कामाची पद्धत दाखवून दिली आहे.

Sushilkumar Shinde यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य; महाराजांचं नाव घ्यायचं अन्…

काही वर्षापासून धुळे शहरात सर्रासपणे अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु होता. अवैध उद्योगधंद्यांवर काही प्रमाणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लगाम लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांशीच हातमिळवणी सर्रासपणे सुरु होती. नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर लगाम लावण्याला सुरुवात केली आहे.

‘उबाठाला निवडणुकीत उभं राहायला १६० उमेदवार तरी…’; संजय शिरसाटांची खोचक टीका

शहरातील बंद राजकमल टॉकीज येथील एका खोलीत लोकेश शालिग्राम सूर्यवंशी व अशोक यशवंत तायडे हा आपल्या देखरेखीखाली पत्त्यांच्या कॅटवर जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यामुळे या छाप्यात रोकड, जुगाराचे साहित्य, मोबाईल तसेच मोटारसायकली असा तब्बल 17 लाख 35 हजार 60 रुपयांचा मुद्दामाल पोलीस पथकाने जप्त केला.

यात जुगारअड्डा मालक संशयित आरोपी लोकेश सूर्यवंशी (रा. जुने धुळे) फरारी झाला आहे. त्याचा साथीदार अशोक तायडे यांच्यासह दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने जप्त केली. तसेच हा जुगारअड्डा भर बाजारात चालू असल्यामुळे या ठिकाणी बघणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

कारवाईवेळी स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अमरजित मोरे, प्रकाश पाटील, श्‍याम निकम, दिलीप खोंडे, हवालदार मच्छिंद्र पाटील, रवींद्र माळी, संदीप पाटील, प्रकाश सोनार, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, प्रशांत चौधरी, मायुस सोनवणे, प्रल्हाद वाघ, नीलेश पोतदार, राहुल गिरी, गुणवंत पाटील, किशोर पाटील, योगेश साळवे, देवेंद्र ठाकूर, सुशील शेंडे आदींनी ही कारवाई केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube