बापाचा जीव वाचवण्यासाठी मुलगा शिरला आगीत; नगरमधील घटना

बापाचा जीव वाचवण्यासाठी मुलगा शिरला आगीत; नगरमधील घटना

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील अंबर प्लाझा बिल्डिंगला (Amber Plaza Building) आग लागल्याची घटना घडली होती. या बिल्डींग मध्ये असलेल्या अनेक कार्यालयांना या आगीने आपल्या कवेत घेतले होते. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले होते, परिसरात आगीच्या धुराचे लोळ पसरले होते, परिसरात आगीमुळे धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते.

अंबर प्लाझा बिल्डींगमध्ये आग लागलेल्या कार्यालयात अडकलेल्या लोकांना कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून सीडीच्या सहाय्याने नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले तसेच इंजिनिअर विजयकुमार पादीर हे देखील या आग लागलेल्या कार्यालयात अडकलेले होते. त्यांना वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु होती. त्यांना वाचवण्यात अपयश येत होते. इंजिनिअर विजयकुमार पादीर हे आग लागलेल्या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा संकेत पादीर हा तेथे पोहचला. त्याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी अंबर प्लाझा बिल्डींगच्या पसेज मध्ये प्रवेश केला आणि मोबाईलच्या सहाय्याने त्यांच्याशी संपर्क साधत राहिला.

Sujay Vikhe Patil; भिंगार छावणीचा सहा महिन्यात महापालिकेत होणार समावेश

वडिलांना कशा प्रकारे वाचवता येईल यासाठी जीवाचा आटापिटा करत होता. पादीर यांना वाचवण्यासाठी नागरिकांनी सतर्कता दाखवत कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी सीडी लावण्यात आली मात्र दुर्दैव असे की अंतर जास्त असल्याने सीडी उंचीला कमी पडत होती. यामुळे इंजिनिअर विजयकुमार पादीर हे बाहेर येण्यासाठी सीडीपर्यंत पोहचत नव्हते. यावेळी उपस्थितांनी अक्षरशःडोक्यावर सीडी धरत विजयकुमार पादीर यांना त्या सीडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. वडील आगीच्या संकटातून सुखरूप बाहेर आल्याने मुलगा संकेत पादीर याने सुटकेचा निश्वास सोडला. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

नगर-आष्टी रेल्वेला लागलेली आग आता संशयाच्या भोवऱ्यात, थेट रेल्वे मंत्र्यांकडेच तक्रार

दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करत ताबडतोब प्रशासन यंत्रणा सज्ज केली. तातडीने पोलीस आणि मनपा अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु झाले होेते.

https://youtu.be/TWTz-tEoto4?si=Xmt-lHEMOunZZgcT

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube