पालकमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

पालकमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

Unseasonal rain In Ahmednagar : अवकाळी पावसाने नुकसान (Unseasonal rain)झालेल्‍या शेतकऱ्यांच्‍या (Farmer) पाठीशी राज्‍य सरकार (Maharashtra State Government)खंबीरपणे उभे आहे. शेतातील उभ्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)हे सुध्‍दा जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्‍यासाठी येणार आहेत. झालेल्‍या नुकसानीचे वस्‍तुनिष्‍ठ पंचनामे (Panchnama)करण्‍याच्‍या सूचना महसूल आणि कृषी विभागाला देण्‍यात आल्या आहेत, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्‍वाही अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी दिली.

रणजी ट्रॉफी 28 जूनपासून सुरू होणार, 70 दिवस चालणार सामने

दोन दिवसांपासून राहाता तालुक्‍यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीची मंत्री विखे पाटील पाहणी केली. पालकमंत्र्यांनी जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमट, जिल्‍हा अधीक्षक कृषी आधिकारी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्‍यासह कृषी आधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून दिलासा दिला आहे. ठिकठिकाणी रस्‍त्‍यात थांबलेल्‍या शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांची त्‍यांनी आस्‍थेनं चौकशी केली.

काढणीला आलेले द्राक्षांचे घड गारपिटीने फुटले आहेत. बाजारात त्‍याची विक्री होणार नाही, अनेक द्राक्ष उत्‍पादकांनी व्‍यापाऱ्यांना बोलावून आपले व्‍यवहारही ठरविले होते. परंतु या सर्व नैसर्गिक आपत्‍तीने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागलेल्‍या शेतकऱ्यांनी आपली कैफीयत अतिशय हाताशपणे मंत्र्यांसमोर मांडली आहे.

यासर्व संकटात राज्‍य सरकार तुमच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्‍वासित करुन मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, कृषीमंत्री असताना नाशिक जिल्‍ह्यातील द्राक्ष उत्‍पादकांना दिलासा देण्‍यासाठी विशेष मदतीचे पॅकेज आपण दिले होते. याच धर्तीवर अशी काही मदत द्राक्ष उत्‍पादकांना करता येईल का याचा विचार मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत निश्चित करु. याबाबतची माहिती तातडीने सादर करण्‍याच्‍या सुचनाही त्‍यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिल्‍या. पंचनामे करतांना गारपीटीचे फोटो आवश्‍य जोडावे असेही त्‍यांनी आधिकाऱ्यांना सुचित केले.

पाहणी दौऱ्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत साईबाबा संस्‍थानच्‍या सभागृहात आढावा बैठकही पार पडली. या बैठकीला राहाता, कोपरगाव, संगमनेर या तीनही तालुक्‍यांचे महसूल आणि कृषी विभागांचे वरिष्‍ठ आधिकारी उपस्थित होते. तालुका निहाय झालेल्‍या नुकसानीची आकडेवारी त्‍यांनी जाणून घेतली.

वादळी वाऱ्याने वीजेच्‍या ताराही अनेक ठिकाणी तुटल्‍या आहेत, त्‍याची जोडणी तातडीने करुन, वीजप्रवाह सुरळीत करण्‍याच्‍या सूचना यावेळी त्‍यांनी दिल्या. सर्व नुकसानीचा अहवाल समन्वयाने तयार करावा, मागील नैसर्गिक आपत्‍तीमधील किती शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, याची माहितीही त्‍यांनी या बैठकीत जाणून घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube