नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यात ठरले ‘नंबर वन’; मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त कर्णिक यांचा गौरव

Sandeep Karnik-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांचा गौरव करण्यात आला.

  • Written By: Published:
Sandip Karnaik Nashik Cp

Nashik Police e-Governance : नाशिक पोलिसांकडून गुन्हेगारांवर वचक बसविणारी कामगिरी केली जाते. तसेच नागरिकांच्या समस्याही सोडविल्या जातात. 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स या उपक्रमात नाशिक पोलिसांनी (Nashik Police) नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा उपक्रम राबविला. या उपक्रमात नाशिक पोलिस आयुक्त कार्यालय राज्यात पहिले आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पेतून राज्यात 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रम आयोजित केला होता. यात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा उपक्रम राबविण्यात आला होता. नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाने सर्वाधिक 156.25 गुण मिळविले.

आम्ही हा पुरस्कार एक आव्हान म्हणून स्वीकारत आहोत. या गतीला अधिक बळ देत पुढे जाण्यासाठी, डिजिटल सुधारणा अधिक सखोल करण्यासाठी आणि नागरिक-केंद्रित, तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगचा दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी. अजून खूप पल्ला गाठायचा आहे, असे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

नागरीकांशी थेट संवाद
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त कार्यालयाने डिजिटल उपक्रम राबविले. या उपक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यासाठी ई मीट वीथ सीपी, वॉक इन टूर, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असे विविध उपक्रम राबविले. यामुळे पोलिस दलाच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला.

follow us