मानाची काठी कळसाला भेटवून मढी यात्रेला सुरुवात

  • Written By: Published:
मानाची काठी कळसाला भेटवून मढी यात्रेला सुरुवात

अहमदनगर : कानिफनाथ महाराज की जय,असा जयघोष करत कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला व समाधीला भेटून श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रा उत्सवाची आजपासून सुरुवात झाली. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालते.

धार्मिक परंपरेनुसार वारी
रविवारी (ता.५) रात्री पाथर्डी शहरातून वाजतगाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपारिक तालात मिरवणूक’ रात्रभर मिरवत सकाळी मढीला आली. ग्रामप्रदक्षिणा करत धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी दहा वाजण्याचा सुमारास मानाची काठी कळसाला लागली. त्यांनतर अमावस्येपर्यंत १५ दिवस विविध गावांचे भाविक येऊन मंदिराच्या छोट्या कळसाला काठ्या लावून मढीची वारी पूर्ण करतात. नाथांची काठी बसवण्याची अनेक घरामध्ये परपंरा आहे.

Uddhav Thackeray गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईरांच्या घरावर एसीबीचा छापा! 

कैकाडी समाजाचे मानकरी नारायण बाबा जाधव, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, गोकुळ दौंड, मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सरपंच संजय मरकड, मढी देवस्थानचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, सहसचिव शिवजीत डोके, विश्वस्त अर्जुन शिरसाठ आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube