चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा, औंध-बोपोडीत ‘इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

औंध आणि बोपोडी परिसरात रविवारी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या ‘इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 07T131555.266

Overwhelming response to the ‘Eco-friendly Ganesha Idol Workshop’ : ‘आपले पर्यावरण, आपली जबाबदारी… आपल्या मुलांनी बनविलेला बाप्पा येईल घरी!’ या संकल्पनेतून औंध आणि बोपोडी परिसरात रविवारी (दि. 6 सप्टेंबर) पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या ‘इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औंध येथील कै. इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय तसेच बोपोडी येथील ज्येष्ठ नागरिक हॉल, पार्किंग एरिया येथे ही कार्यशाळा पार पडली. 7 ते 12 वर्षे तसेच 12 वर्षांवरील मुलांसाठी आयोजित या उपक्रमात मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी शाडू मातीपासून स्वतःच्या हातांनी गणेशमूर्ती साकारल्या. मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक शाडू माती आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आली.

बाप्पाची मूर्ती घडविताना मुलांनी दाखविलेली सर्जनशीलता आणि उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. या उपक्रमातून मुलांना कलात्मक कौशल्याची संधी मिळण्यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्वही प्रत्यक्ष कृतीतून समजले.

…तर दहा मिनिटांच्या आत अख्खा महाराष्ट्र बंद पडला पाहिजे, जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा

नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, “गणेशोत्सवाची परंपरा जपत पर्यावरणाचेही संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मुलांनी स्वतःच्या हातांनी शाडू मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचावा, हा या कार्यशाळेमागील मुख्य उद्देश आहे.”

यावेळी मुलांशी संवाद साधत शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे पर्यावरणीय महत्त्व, प्रदूषणमुक्त गणेशोत्सव आणि निसर्ग संवर्धनाची गरज सोप्या उदाहरणांतून समजावून सांगण्यात आली. तसेच प्रशिक्षक आणि पालकांच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले.

‘परंपरा जपूया, पर्यावरणही वाचवूया’ या विचाराला चालना देणाऱ्या या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.

follow us