‘ती’ महिला दाऊद गँगशी संबंधित, प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करा : राहुल शेवाळे

‘ती’ महिला दाऊद गँगशी संबंधित, प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करा : राहुल शेवाळे

मुंबई : आपल्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी आपल्याला त्या महिलेनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे. संबंधित महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचंही शेवाळे यांनी सांगितलंय. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची एनआयएच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडं केली.

आपल्याच पक्षातील लोक त्या महिलेला संपर्क करुन आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप शेवाळेंनी केलाय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला या प्रकरणी मदत केली असल्याचं शेवाळेंनी सांगितलं. त्या महिलेला कोरोनाच्या काळात मी मदत केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

संबंधित महिला दुबईची आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने संबंधित महिलेनं फेक अकाऊंट चालवले होते. आपल्या पत्नीला वारंवार धमक्या आल्याचेही शेवाळे म्हणाले. ही महिला खोट्या तक्रारी करत असल्याची माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी याविषयी लक्ष देण्यास तत्कालीन मंत्री अनिल परब यांना सांगितलं. याप्रकरणी आपल्याला उद्धव ठाकरेंनी मदत केल्याचंही शेवाळेंनी सांगितलं.

पुढे त्या महिलेकडून आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शेवाळेंनी सांगितले. यावेळी या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी खासदार शेवाळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

शिवसेना सोडल्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचंही त्यांनी सांगितलं. युवासेना प्रमुखांमुळेच या गोष्टी घडल्याचे सांगत शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केल्याचं दिसून येतंय. या महिलेला युवा सेनेचे पदाधिकारी फॉलो करत असल्याचेही शेवाळे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube