Download App

Letsupp Special : पत्नी अन् पर्सनल सेक्रेटरी, वसंतदादा जीवनात कसे आले? शालिनीताईंनी सांगितली स्टोरी

Sahlinitai Patil Love Story : अनेक राजकीय नेत्यांच्या लव्हस्टोरी आपण अनेकदा पाहिल्या आणि वाचल्या आहेत. पण आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील 70 च्या दशकातील एका पॉवर कपलची लव्हस्टोरी कशी होती? हे जाणून घेणार आहेत. हे पावर कपल होतं. शालिनीताई पाटिल आणि वसंतदादा पाटिल आज वसंतदादा पाटिल हयात नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटिल यांची लेट्सअप मराठीने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते रोखठोक व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्याबद्दही माहिती दिली. (Sahlinitai Patil and Vasantdada Patil Love Story )

कर्डिले यांनी डाव टाकला ! काँग्रेसच्या माजी खासदाराचा नातू भाजपमध्ये

काय म्हणाल्या शालिनीताई पाटिल?

‘मी पहिल्यापासून कॉंग्रेसची कार्यकर्ती होते. 1957 ला ग्रॅज्युएट झाले. तेव्हा मला कॉंग्रेकडून जिल्हा लोकल बोर्ड आणि नंतर जिल्हा परिषदेचं सदस्यत्व देण्यात आलं.त्यानंतर मी 1964 ला वसंतदादांच्या आयुष्यात आले. तेव्हा ते सांगलीचे आमदार आणि कॉंग्रेस कमिटीचे उपाध्याक्ष होते. मुंबईत ते एकटे असल्याने त्यांच्याकडे घर नव्हतं. मी आल्यानंतर आम्ही घत घेतलं. माझ्या आणि त्यांच्या वयात खुप अंतर होत.’

अजित पवारांचं बंड सत्तेसाठी पण शरद पवार कुणालाही माफ करत नाही; शालिनीताई पाटलांचा इशारा

पुढे वसंतदादांच्या स्वभावाबद्दल सांगताना शालिनीताई म्हणाल्या की, ‘तो काळ जुना होता त्याच बरोबर जशी एका टीपिकल मराठी मानसाची मानसिकता त्या काळी होती की, आपल्या बायकोने डोक्यावर पदर घेऊन आपल्या मागे चालावे. बरोबरीने नाही. तशीच वसंतदादांचीही मानसिकता होती. त्याचा मला त्रास झाला. पण मुलं लहान असल्याने मी तो सहन केला.’

मी पहिल्यापासून वसंतदादांची पत्नी आणि पर्सनल सेक्रेटरी होते. कॉंग्रेस आणि साखर उद्योगातील काम मी बघायचे. त्यामुळे कायम पुढे दिसायचे पण लोकांना वाटायचं मी खुप महत्त्वकांक्षी आहे. पण वसंतदादांना आपली बायको ही कायम मुल बाळ सांभाळणारी असावी. तीच्या काही महत्त्वाकांक्षा नसावी.

Tags

follow us