Sanjay Gaikwad म्हणाले, आता ती वेळ आलीय…,
बुलढाणा : आता संजय राऊतांचं थोबाड फोडायची वेळ आलीय, असल्याचा इशाराच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. संजय राऊत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या भाषेत वक्तव्य करीत आहे त्यामुळे आता त्यांची थोबाड फोडायची आणि जीभ हासाळण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले आहेत.
सत्तेतून पायउतार झाल्यानंतर संजय राऊत कायमच विरोधकांवर निशाणा साधत असतात. उद्धव ठाकरे यांची बुलंद तोफ म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. त्यामुळे राऊत विरोधकांवर टीक-टिप्पणी करत असतात. त्यावर संजय राऊतांना कायदेशीर अक्कल असती तर हे केलं नसतं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Thackeray Vs Shinde : आदित्य ठाकरे यांची आमदारकी एकनाथ शिंदे घालविणार? कायदा म्हणतो…!
संजय राऊत जेव्हा समोर येईल तेव्हा त्याचे काय हाल करील हे येणारा काळचं ठरवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. निवडणूक आयोगाने हे केलं, ते केलं, असं तो बोलत असतो, त्याला जर अक्कल असती तर त्याने हे केलं नसते, असं एकेरी भाषेत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
गव्हाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
ज्यांच्या रक्तात, नसानसात लाचारी आहे ते मालक बदलत असतात, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दोन हजार कोटींना सौदा झाला असल्याचा आरोप संजय राऊतांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांकडून निशाणा साधला आहे.
Sanjay Raut : नगरसेवक, आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठीही ठरला रेट; राऊतांनी आकडाच सांगितला
दरम्यान, नूकतीच संजय राऊतांचा शहाजीबापू पाटील यांनी समाचार घेतला असून आता आमदार संजय गायकवाड यांनीही संजय राऊतांच्या आरोपांवर भडकल्याचं दिसून आलंय.