Sharad Pawar : संभाजी भिडे, तुषार भोसलेंची खरी नावं शाळेत जाऊन तपासा मग कळेल; पवारांची टीका
Sharad Pawar on Sambhaji Bhide and Tushar Bhosale : ‘कोण भिडे कशाची नावं घेत आहात तुम्ही? तसंही आपल्यातील काही लोकांनी नावं बदलली आहेत. तुम्ही चौकशी करा की, भाजपच्या आध्यामिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) जरा त्यांची नावं काय ते त्यांच्या शाळेमध्ये जाऊन तपासा मग तुम्हाला कळेल. खरचं संभाजी भिडे हे यांचं नाव संभाजी आहे का? तसेच तुषार भोसलेंचं नाव भोसले आहे का? ते.’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी संभाजी भिडे, तुषार भोसले यांच्यावर केली आहे. त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. (Sharad Pawar says Check Sambhaji Bhide and Tushar Bhosale names in their schools it will be different )
Baipan Bhari Deva Review: बाईच्या मनातला मनमोकळा संवाद…बाईपण जगण्याची धमाल गोष्ट
या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना संभाजी भिडे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. त्याऐवजी त्यांनी थेट शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि भाजपच्या आध्यामिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या खऱ्या नावांवरच प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की, अनेकांनी नावं बदलली आहेत. त्यांची खरी नाव काय ते त्यांच्या शाळेमध्ये जाऊन तपासा मग तुम्हाला कळेल. खरचं संभाजी भिडे हे यांचं नाव संभाजी आहे का? तसेच तुषार भोसलेंचं नाव भोसले आहे का? ते.
Horoscope Today: ‘या’ राशींचा भाग्य उजळणार! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
त्याचबरोबर त्यांनी यावेळी देशासह राज्यातील अनेक प्रश्नांवर प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यात जोरदार जुंपली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला आहे. त्याला शरद पवारांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. मी जर त्यांना फसवले असे त्याचे म्हणणे आहे. तर तुम्ही का फसलात असा खोचक सवाल पवारांनी फडणवीसांना केला आहे. तसेच सत्तेशिवाय ज्यांना करमत नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते तर राज्यातील नेते होते, असा टोलाही पवारांना लगावला आहे. त्याला आता देवेंद्र फडणवीसांना जोरदार उत्तर दिले आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाा. मुलींवर हलले करणं, त्यांना बेपत्ता करणं ह्या गोष्टी सातत्याने राज्यात घडतात. त्यामुळं राज्याच्या गृहमंत्र्यांना इतर वक्तव्ये करण्यापेक्षा या महिला कशा बेपत्ता झाल्या? त्याचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली कशा करता येतील, यासाठी काही उपाययोजना कराव्यात, असा सल्ला पवारांनी दिला.