शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार?

शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार?

sanjay raut On Supreme Court Petition : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आता शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhavan)आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) संपत्तीवरही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरुन पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, इतक्या जमिनी लुबाडल्यात त्या काही कमी पडल्या की काय? ते आता आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना भवनावरही ते दावा सांगत आहेत? असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, मुळात ही याचिका शिंदे गटाकडून अधिकृत आहे का? याची माहिती घ्यायला पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले. तर ही याचिका शिंदे गटाकडून अधिकृत नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

बाबरी पडली तेव्हा अयोध्येत बाळासाहेब व शिवसैनिक नव्हते, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर आता शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी शिवसेना प्रमुखांकडे म्हणजेच एकनाथ शिंदेंकडे सोपवा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात अॅड. आशिष गिरी यांनी केली आहे. त्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

आज मेधा सोमय्या यांच्या मानहाणी प्रकरणात संजय राऊत न्यायालयात उपस्थित राहिले. त्यावेळी न्यायालयात मेधा सोमय्यांची उलट तपासणी करण्यात आली. त्यावेळी मेधा सोमय्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं नाही अशी दिली आहेत. त्यांनी पैसा सरकारी वापरला की त्यांचा स्वतःचा वापरला असा प्रश्न केल्यानंतर त्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.

राऊत म्हणाले की, जनतेच्या पैशांबद्दल जर काही प्रश्न असतील तर त्यावर प्रश्न विचारणं हे लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचं काम आहे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी राऊत म्हणाले की, माझा आणि मेधा सोमय्यांचा जुना परिचय आहे. त्यांना नमस्कार करणं हा संस्कृतीचा भाग आहे. त्या एक प्राध्यापिका आहेत. त्यांना नमस्कार करणं माझं कर्तव्य आहे. त्यांनी जरी माझ्याविरोधात खटला दाखल केला असला तरीही त्यांना नमस्कार करणं आपलं कर्तव्य असल्याचं खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube