मोठे मोठे गार केले गंम्मतमध्ये… राजन पाटलांच्या खेळीने उमेश पाटलांना पराभवाचा धडा!
Solapur ZP मोहोळ तालुका हा राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील अंतर्गत स्पर्धेसाठी ओळखला जातो, जिथे दर निवडणुकीत चुरस पाहायला मिळते.
Solapur ZP Result Umesh Patil Vs Rajan Patil Politics : मोठं मोठे गार केले गम्मत मधी हे वाक्य किंवा गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं अथवा पाहिलं असेल. यात एक व्यक्ती दंड थोपटतांना दिसते ती म्हणजे माजी आमदार राजन पाटील. होय याच राजन पाटलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या खास शैलीने उमेश पाटलांना पराभवाचा धडा शिकवलाय. नेमकी कशी झाली मोहोळची निवडणूक त्याबद्दल जाणून घेऊया…
Khed Politics : बाबाजी काळे, अख्ख्या राज्यात एकहाती सत्ता मिळवणारा ठाकरेंचा वाघ
मोहोळमध्ये पाटील विरूद्ध पाटील संघर्ष
मोहोळ तालुका हा राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील अंतर्गत स्पर्धेसाठी ओळखला जातो, जिथे दर निवडणुकीत चुरस पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस रामराम करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर प्रथमच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
बाळराजे पाटलांचे वादग्रस्त विधान
मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटाची मोठी चर्चा सर्वाधिक झाली होती. कारण या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील निवडणूक लढवत होते. मात्र, त्यांचा कुरुल गटातून भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी १,३०३ मतांच्या फरकाने उमेश पाटलांना पराभवाची धूळ चारली. मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विकासाच्या मुद्याऐवजी खालच्या पातळीवर टीका टिप्पणीने गदारोळ झाल्याचे पाहण्यास मिळाले. तुम्हाला राजन पाटलांची मुलं इतकीच आवडत असतील तर, तुमच्या मुलांच्या नावासमोर आमची नावं लावा असे भडक विधान माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटलांनी उमेश पाटलांना उद्देशून केले होते. त्यामुळे मोहोळ जिल्हा परिषदेचा निकालाचा फटका भाजपला आणि विशेष करून राजन पाटलांना बसतो याकडे सर्वांचा नजर लागल्या होत्या. पण, राजन पाटलांनी त्यांच्या स्टाईलने खेळी करत उमेश पाटलांना पराभवाची धूळ चारलीच.
जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील यांनी ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं होतं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाकयुद्ध पाहायला मिळाले. उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर “दहशतीचे राजकारण” केल्याचा आरोप केला होता, तर राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांना “छोटा माणूस” संबोधले होते. त्यामुळं मोहोळ तालुक्यातील कुरुल आणि नरखेड गटाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. Solapur ZP Result Umesh Patil Vs Rajan Patil Politics
भावाचाही दारूण पराभव
ज्या पद्धतीने कुरूल जिल्हा परिषदेच्या निकालाकडे सर्वाच्या नजर लागल्या कारण या ठिकाणी खुद्द उमेश पाटील मैदानात होते. त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्यातील नगरखेड जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील हे निवडणुकीच्या मैदानात होते. पण, ज्याप्रमाणे कुरूलमध्ये उमेश पाटलांचा पराभव झाला त्याच पद्धतीने नरखेड गटातून संतोष पाटील यांचा भाजपचे उमदेवार लखन शिंदे यांनी 4000 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत दोन्ही भावांचा पराभव झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यात रारान पाटील यांची खेळी यशस्वी होऊन त्यांनी उमेश पाटलांना धडा शिकवल्याची चर्चा सुरू झाली असून, दोन्ही बंधुंच्या पराभवामुळे राजन पाटील आणि उमेश पाटील या दोन्ही पाटलांमध्ये आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरपुडकरांच्या परिवारवादाच्या परभणीकरांकडून चिंधाड्या, पाचपैकी चौघांचा दारून पराभव
मोहोळ अन् राजकीय ताकद
राजन पाटील हे मोहोळमध्ये राजकीय ताकदीचं एक महत्त्वाचं नाव म्हणून ओळखले जातात त्यांनी 1990‑2000 दशकात सलग तीन वेळा आमदारपद भूषविले आहे. त्यांचे मोहोळ आणि आसपासच्या ग्रामीण मतदारांमध्ये परंपरागत पाठबळ असून, भाजपात दाखल झाल्यामुळे त्यांना राजकीय आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून अधिक बळकटी मिळाल्याचं चित्र आहे. राजन पाटील अजूनही मोहोळमध्ये महत्त्वाकांक्षी आणि सक्रिय राजकीय नेते मानले जातात, त्यांच्या नेतृत्वाने विजय आणि पराभव दोन्ही अनुभवले असून, स्थानिक राजकारणात त्यांची भूमिका फार मोठी राहिली आहे. त्यामुळे हा सर्व अनुभव आणि राजकारणातलं छक्के-पंजे खेळत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजन पाटलांनी उमेश पाटलांना पराभवाचा धडा शिकवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
