Supriya Sule : जातीत लग्न करा असे ठरवणारे हे कोण ? सुप्रिया सुळे यांचा सवाल
भाजपवाले लग्नाबद्दल सतत उलटे लोकांना सांगत आहेत. ते सांगतात जातीत लग्न करा, पण जातीत लग्न करा, असे तुम्ही कोण ठरवणारे ? असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेस बसलेल्या मुलींना तुम्हाला चालेल का आम्ही लग्न ठरवलेले, असा प्रश्न विचारला. सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्र आणि राज्यातील सरकारवर कडाडून टिका केलीय.
यावेळी त्यांनी स्वतःच्याच घरातील उदाहरण दिले. त्या महालय की, “रेवतीचे (सुप्रिया सुळे यांची मुलगी) लग्न माझे पती सदानंद आणि मी ठरवू. अजित दादा रेवतीचा मामा आहे म्हणून ठरवेल तिचं लग्न कोणाशी करायचं. आमदार दत्तात्रय भरणे मामा व राज्याचे मुख्यमंत्री हे नाही सांगू शकत की रेवतीचं लग्न कुणाशी करायचं.”
हेही वाचा : Tamil Nadu : मुख्यमंत्र्यांची घोषणा..महिला कुटुंबप्रमुखांना मिळणार एक हजार
त्या पुढे म्हणाल्या की, “सुप्रिया सुळे आता मुख्यमंत्री आहोत तुमची मुलगी ह्याच्याशी लग्न करेल, असं नाही सांगू शकत. आमच्या मुली आता शिकलेल्या आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतील. माझी मुलगी काय खाईल. कोणाशी लग्न करेल ती कसं जगेल, हे आम्ही कुटुंबठरवू. किंवा ती निर्णय प्रक्रियेत असेल.”
खरा हिंदू कोण ?
“त्यांनी आसामला भीमाशंकर दिल असलं तरी मी आसामला भीमाशंकर देऊ देणार नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना याना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचा अधिकार नाही. आपली आत्मीयता असलेला ज्योतिर्गलिंग त्यांनी आसामला दिला. त्यामुळे आता ते खरे हिंदू कि मी खरी हिंदू हे तुम्हाला ठरवायचं आहे.” हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.