लक्ष्मण हाके-भुजबळ वादाचा मोठा इफेक्ट ; ओबीसीतील दोन मोठ्या जातीत फूट कशी पडली ?
laxman Hake-भुजबळ हाके यांच्यात सुरुवातीला झालेली अप्रत्यक्ष शाब्दिक चकमक यामुळे भुजबळ दुखावले गेले. तर हाके यांनी इतर नेत्यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण लढा सुरूच ठेवला.
संतोष पाटील
प्रतिनिधी
laxman Hake VS Chhagan Bhujbal: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (laxman Hake) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हाके यांनी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) थेट टीका केलीय. हाके यांनी पहिल्यांदाच अशी टीका भुजबळांवर केला का ? तर नाही. हाकेंनी अनेकदा भुजबळांवर टीका केली. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला. त्याचा फटका ओबीसी लढायलाही बसला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोठा लढा उभा केला. अंतरवाली सराटी येथून या लढ्याला सुरुवात झाली. जरांगे यांनी 18 दिवसांच पहिले आमरण उपोषण केले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अंतरवाली सराटी गाठत जरांगे यांचे उपोषण सोडवले. मात्र सरकारने काही शब्द पाळला नाही. त्यामुळे जरांगे यांनी अंतरवालीत दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरु केले. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल म्हणून भुजबळ यांनी सर्व ओबीसीना एकत्र करायला सुरुवात केली. जरांगे यांच्या विरोधात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे वडीगोद्री येथे आमरण उपोषणास बसले असे एकूण तीन आमरण उपोषण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केले. तोपर्यंत भुजबळ आणि हाके यांच्यातील संवाद हा चांगला होता. या उपोषणानंतर ओबीसी समाजात आरक्षणाबद्दल जनजागृती करण्यासाठी हाके अवघे राज्यभर फिरले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी खास व्यासपीठ सुरू होणार; परीक्षेच्या प्रक्रियेसाठी आयोग नेमणार
समीर आणि पंकज भुजबळ काही कामाचे नाहीत, पहिली ठिणगी पडली
हाके यांचा एका हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत हाके यांनी समीर आणि पंकज भुजबळ काही कामाचे नाहीत असे म्हणत भुजबळ यांच्यावर टिका केली. त्यातून भुजबळ आणि हाके यांच्यातील वाद सुरू झाला. या व्हायरल व्हिडीओवर भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मात्र हाके यांनी आपण असे काही बोललोच नाही असे म्हणतं स्वतःच्या चुकीवर चादर फिरवत सारवा सारव केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भुजबळ आणि हाके यांच्यात दुरावा निर्माण झाला. या बिघडलेल्या संबंधामुळे अजूनही हाके आणि भुजबळ यांच्यात अजूनही संवाद नसल्याची चर्चा आहे. दरम्यान नंतर हाके यांनी ओबीसी आंदोलन पुढे नेण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी हातमिळवणी केली. मात्र भुजबळ यांनी नंतर हाके यांच्याशी दुरावाचं ठेवणे पसंत केले.
Rajesh Mehta : LIC चे कार्यालय कुठे आहे? मला माहिती नाही; सेबी प्रकरणात राजेश महेताची प्रतिक्रिया
भुजबळ -हाके यांच्यातील वादाचा ओबीसी लढायला फटका
भुजबळ हाके यांच्यात सुरुवातीला झालेली अप्रत्यक्ष शाब्दिक चकमक यामुळे भुजबळ दुखावले गेले. तर हाके यांनी इतर नेत्यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण लढा सुरूच ठेवला. अर्थात या दोघांमध्ये झालेले वाद आणि त्याचा परिणाम ओबीसी आरक्षण लढ्यावर पाहायला मिळाले. जरांगे यांनी पहिल्या उपोषणापासून भुजबळ यांना टार्गेट केले. तेव्हा भुजबळ यांच्यावर जरांगे यांनी केलेल्या टिकेला हाके प्रत्युत्तर द्यायचे. मात्र दोघांमधील वादामुळं हाके यांनी जरांगे यांच्यावर भुजबळ यांच्याबद्दलच्या टिकेला उत्तर देणे बंद केले. ओबीसी आरक्षण चळवळ काही प्रमाणात कमकुवत झाली. ओबीसी नेत्यांमधील संवाद फिका पडला. याचा परिणाम ओबीसी आंदोलनावर झाल्याने ओबीसी आरक्षण आंदोलन कमकुवत झाले.
ओबीसी आंदोलकांची संख्या घटली
ओबीसी आंदोलनात येणाऱ्या आंदोलकांची संख्या कमी होऊ लागली. हाके यांच्या आंदोलनात धनगर बांधव मोठ्या संख्येने दिसू लागले. मात्र भुजबळ यांच्याशी झालेल्या वादामुळे माळी समाज बांधव हाके यांच्या आंदोलनात दिसले नाहीत. अनेक सभेत भुजबळ उपस्थित राहिले मात्र हाके सभेत दिसले नाहीत. तर ओबीसीच्या काही सभेत हाके दिसले मात्र भुजबळ आले नाहीत दोघाही नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येणे टाळले. त्यामुळं भुजबळ आणि हाके यांच्यातील वाद आजही कायम असल्याच दिसून येत आहे याचा परिणाम ओबीसी चळवळीवर झालेला दिसून आला असून ओबीसी चळवळ आणि आंदोलन कमकुवत झाल्याची चर्चा आहे.